मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर स्टारर अभिनेता संजय दत्तचा बायोपिक गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेरसिकांना केवळ सिनेमा पाहण्यासाठीच नव्हे तर सिनेमाचं नेमकं नाव काय असणार, याबाबतही उत्सुकता लागली होती. अखेर आज रणबीर कपूरचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'संजू' असे संजय दत्तच्या बायोपिकचं नाव असून हा सिनेमा 29 जूनला बॉक्सऑफिसवर झळकला आहे.
सिनेमाच्या टीझरमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील सुरुवातीच्या दिवसांपासून ते करिअरपर्यंतचे चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. टीझरच्या सुरुवातीला संजय दत्त येरवडा तुरुंगातून बाहेर पडताना दाखवण्यात आले आहे. ''अपना लाईफ फुल साप-सीडी बोर्ड है, कभी अप तो कभ डाउन'', या संवादानं टीझरची सुरुवात होते.
ज्यावेळी संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेला होता, ती कहाणीदेखील संजय दत्तच्या तरुणपणातील भूमिका साकारणाऱ्या रणबीर येथे सांगितली आहे. टीझरमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. बस स्टॉपवर भीक मागण्यापासून ते न्यू-यॉर्कमधील मोठ्या हॉटेल्समध्ये राहण्यापर्यंत ते कारागृहात भोगलेल्या शिक्षेपर्यंतची कहानी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे तर विधु विनोद चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आई नरगिस संजय दत्तला प्रेमाने 'संजू' या नावानं हाक मारायची म्हणून या सिनेमाचं नाव राजकुमार हिरानी यांनी संजू असे ठेवले.
व्हिडीओ पाहा :