सातरस्ता उड्डाणपूलांच्या निर्मितीत १५३ झाडांवर येणार संक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 07:03 PM2020-10-13T19:03:02+5:302020-10-13T19:03:33+5:30
Construction of Road : उड्डाणपूल प्रस्तावित आहे.
मुंबई: महालक्ष्मी स्टेशन परिसराभोवती वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि वरळी नाका व हाजी अली जंक्शनला थेट जोडणाऱ्या सुमारे 100 कोटी रुपयांचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. मात्र या उड्डाणपूलांच्या निर्मितीसाठी या परिसरातील सुमारे 153 पुरातन झाडांवर संक्रांत येणार आहे. तर पालिकेचे उद्यानखाते 47 झाडांचे प्रत्यारोपण करणार आहे.
विकासकांच्या फायद्यासाठी पर्यावरणाचे नुकसान करून येथील153 पूर्णपणे निरोगी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी तीव्र विरोध केला आहे.
सात रस्त्यावर आणि महालक्ष्मी स्टेशन परिसराचे सुशोभित करण्यासाठी वरील दोन रस्ता ओव्हर ब्रिज तयार करण्यात आले आहेत, परंतु प्रत्यक्षात या दोन रस्ता ओला पुलांची निर्मिती म्हणजे मोठ्या विकासकांना मदत करण्यासाठी केली जात असल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त
अॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी लोकमतशी व्यक्त केला.याप्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईतील जीवनमान देखील खालावले आहे आणि ही घसरण बर्यापैकी वेगवान आहे. या सर्वांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीत घसरण झाली आहे, मुंबईचा जागतिक क्रमवारीत 163 वा क्रमांक आहे (जगातील 218 शहरांपैकी). पुढील दशकात परिस्थितीत आणखी दोन दशलक्ष लोकसंख्येची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुबईचे हरितपण टिकणे गरजेचे असल्याचे मत अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी शेवटी व्यक्त केले.