मुंबई : लोकप्रिय कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाची लयलूट घेऊन येत आहोत संक्रांत मेळाव्याद्वारे. २४ जानेवारी रोजी बी.एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, दादर, हिंदू कॉलनी येथे दुपारी ३.३० वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धा यानिमित्ताने आयोजित करण्यात आल्या आहे. ज्यात स्त्रियांच्या आवडीची स्पर्धा म्हणजे उखाणे स्पर्धा. (यात केवळ एक उखाणा घ्यायचा आहे.)तीळ व्यंजन स्पर्धा (गोड किंवा तिखट यापैकी कुठलाही एक पदार्थ घरून करून आणायचा) व संक्रांत सोहळ्याला साजेशी स्पर्धा म्हणजे संक्रांत सखी फॅशन शो (यात काळी साडी व हलव्याचे दागिने घालणे आवश्यक).कुठल्याही एका स्पर्धेत सदस्यांना भाग घेता येईल. सर्व स्पर्धांमध्ये मर्यादित जागा असून प्रत्येक स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. अतिशय आकर्षक असे पुरस्कार या स्पर्धांना ठेवले आहेत. कलर्स चॅनेल म्हणजे स्त्रियांचे मनपसंत चॅनेल. नेहमीच संस्कृती जोपासणारे कार्यक्रम कलर्स वाहिनीच्या वतीने लोकमत सखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यात संक्रांत मेळावा आणखी एक आकर्षण ठरणार आहे. (प्रतिनिधी)पुन्हा एक नवीन विषय, नवीन कलाकार घेऊन कलर्सवर नावीन्यपूर्ण मालिका कृष्णदासी रसिकांच्या सेवेत प्रसारित होणार आहे. २५ जानेवारीपासून रात्री १०.३० वा. कलर्स वाहिनीवर देवदासी प्रथेवर आधारित ही मालिका कुमुदिनी तुलसी आणि आराध्या या स्त्री नायिकांमध्ये गुंफण्यात आली आहे. फार पूर्वीपासून चालत आलेल्या देवदासी प्रथेला आजच्या पिढीच्या नजरेतून मार्मिकपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न कलर्स वाहिनीने केला आहे आणि खास याचसाठी कृष्णभजनाचा कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित केला आहे.
आज रंगणार ‘संक्रांत मेळावा’
By admin | Published: January 24, 2016 1:06 AM