ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - चित्रपटांमधून संस्कारी बाबूजींची भुमिका निभावणा-या आलोकनाथ यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केलं आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात पोलिसांनी शिवांग याला अटक केली आहे. मंगळवारी सकाळी त्याला वांद्रे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग मैत्रीणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. घरी परतत असताना रस्त्यात पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता शिवांगने गाडी न थांबवता वेगाने पळवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ताबडतोब पुढे नाकाबंदीला असणा-या पोलिसांनी गाडीची माहिती कळवली. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी त्याला अडवलं. मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी शिंवागने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी शिवांगला अटक केली असून गाडी जप्त केली आहे. शिवांगला 2600 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.