शांतिनिकेतन बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात

By admin | Published: July 22, 2015 01:10 AM2015-07-22T01:10:54+5:302015-07-22T01:10:54+5:30

शांतिनिकेतन बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार असल्याचे मुख्यमंत्री

Santiniketan rape case in fast track court | शांतिनिकेतन बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात

शांतिनिकेतन बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात

Next

मुंबई : शांतिनिकेतन बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील रसायनीजवळील चांभार्ली येथील शांतिनिकेतन आश्रमशाळेत संचालकांनीच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याबाबतचा प्रश्न आ. मल्लीकार्जुन रेड्डी, सुभाष पाटील, प्रशांत बंब यांनी विधानसभेत विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शांतिनिकेतन आश्रमशाळेतील ३ मुलींवर बलात्कार आणि ४ मुलींचा विनयभंग आश्रमशाळेच्या सेक्रेटरीनेच केला असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणातील मुली अल्पवयीन असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड संहितेची कडक कलमे लावण्यात आली आहेत. तसेच सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार आहे.

Web Title: Santiniketan rape case in fast track court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.