मुंबई : कोरोना विरुध्द सुरू असलेल्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार १ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी मुंबई महापालिका देशात पहिली ठरली आहे. महापालिकेच्या निधीमधूनच कर्मचाऱ्यांना अर्थ सहाय्य केले जाणार आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने सानुग्रह सहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना २९ मे २०२० रोजी दिले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड १९ शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यांना वगळून कोरोना संबंधित सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार आदी काम करताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास ही आर्थिक मदत मिळणार आहे. विविध प्रवर्गातील कामगार-कर्मचारी, कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी-तदर्थ-मानसेवी कर्मचारी यांच्या वारसांना या योजनेचा दिलासा मिळेल.अशी आहे प्रक्रियादावेदाराने अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रं संबंधित खात्याकडे सादर केल्यानंतर या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. संबंधित खात्याने दावा तयार करुन तो प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल. या खात्यामार्फत त्याची छाननी करुन ते प्रकरण प्रमुख लेखापाल (वित्त) खात्याकडे अधिदानासाठी पाठविले जाणार आहे.असे आहेत निकष....च्कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असणे आवश्यक असेल.च्ज्या प्रकरणांमध्ये कोविडची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये महापालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करुन अंतिम निर्णय घेईल.च्संबंधित कामगार, कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना विविध दस्ताऐवजांसह अर्ज करावा लागेल.