Join us

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सारस्वत व एसव्हीसी बँकेला दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 8:22 AM

आरबीआयने केली चार बँकांवर कारवाई

मुंबई : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार मोठ्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. यात राज्यातील सारस्वत सहकारी बँक व एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे. आरबीआयने त्यांना अनुक्रमे २५ लाख आणि ३७.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा तर, अहमदाबादच्या मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकेला ६२.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या चारही बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. एसव्हीसी बँकेवर ठेवींवर दिले जाणारे व्याज आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याचा तर सारस्वत बँकेवर ठेवींवरील व्याजदर आणि इतर नियमांचे पालन न केल्याचा ठपका आरबीआयने ठेवला आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रगुन्हेगारी