Join us

'सारथी' संस्थेस नवी मुंबईतील खारघरमध्ये सरकार भूखंड देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:30 PM

राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सारथी या संस्थेची स्थापना केलेली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७ मधील ३५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी  घेण्यात आला. राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सारथी या संस्थेची स्थापना केलेली आहे. 

संस्थे मार्फत पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय,  सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, इ. सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमुख्यमंत्री