Join us

मुंबईत सरीवर सरी; प्लास्टर कोसळून २ महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 5:29 PM

येत्या ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून मधून सरी कोसळत असून, येत्या ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ७.८ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली असून, ५ ठिकाणी बांधकाम पडल्याच्या घटना घडल्या. सोमवारी रात्री ११ वाजता चेंबूर येथील तळमजला अधिक पाच मजली इमारतीच्या खोली क्रमांक १०४ मधील प्लास्टरचा काही भाग कोसळला. यात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करत त्यांना सोडून देण्यात आले. तर सोळा ठिकाणी झाडे कोसळली. ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊस