ठाणो : युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागून ती न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरनाईक कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून मेरी लुईस आणि तिचे पती संजीत शर्मा यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े याप्रकरणी अद्याप त्यांना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऑस्ट्रेलियन असल्याचे सांगून मेरीने फेसबुकवर पूव्रेशशी संपर्क साधून युवा सेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यादरम्यान, 17 मे रोजी त्या दोघांची मुंबईत एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळीच मेरीने एक कोटींची मागणी करून बदनामीची धमकी दिली. तिचे पती शर्मा यांनी आ. प्रताप सरनाईक आणि नगरसेवक विहंग यांच्याशी संपर्क साधून 1 कोटी न दिल्यास मेरी ही पूव्रेशची मैत्रीण असून त्यापासून ती गरोदर राहिली आहे, अशी बदनामी करण्यात येईल, असे सांगितले. मेरीने प्रतिपा सरनाईक अशा नावाचे फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडून पूव्रेशच्या मित्रंशी मैत्रीसाठी संपर्क साधल्याचे तक्रारीत म्हटले आहे.