गावागावांतील सुव्यवस्थेसाठी ‘सरपंच खरा योद्धा’ वेबिनार; ‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’चा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:18 PM2020-06-08T18:18:00+5:302020-06-08T18:29:37+5:30

‘लोकमत’ने महाराष्ट्रातील सरपंचांसाठी ९ जूनला सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत ‘सरपंच खरा योद्धा’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे.

‘Sarpanch Khara Yodha’ webinar for in villages lokmat | गावागावांतील सुव्यवस्थेसाठी ‘सरपंच खरा योद्धा’ वेबिनार; ‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’चा उपक्रम

गावागावांतील सुव्यवस्थेसाठी ‘सरपंच खरा योद्धा’ वेबिनार; ‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’चा उपक्रम

Next

मुंबई : कोरोनामुळे खोळंबलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मान्सून काही दिवसांत महाराष्ट्रात धडकणार असल्याने शेतीच्या कामांनीही जोर धरला आहे. या काळात सरपंचांवरील जबाबदारी वाढली आहे. हे लक्षात घेत ‘लोकमत’ने महाराष्ट्रातील सरपंचांसाठी ९ जूनला सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत ‘सरपंच खरा योद्धा’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे.

कोरोनामुळे होणारे नुकसान कशाप्रकारे कमी करता येईल? त्यावरचे उपाय काय? तसेच सरकारची धोरणे आणि योजना काय आहेत? हे सारे समजून घेत सरपंचांना आपल्या गावात सुव्यवस्था कशी आणता येईल? याबद्दल या चर्चासत्रात माहिती देण्यात येणार आहे. बीकेटी टायर्स प्रस्तुत ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ चे हे यंदाचे तिसरे पर्व आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे चर्चासत्र होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अहमदनगरच्या हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक असतील. तसेच पुण्याचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, औरंगाबादच्या आदर्श ग्राम पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, अमरावतीच्या आदर्श ग्राम खिरगव्हाणचे आदर्श सरपंच व सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील आणि सरपंच परिषद मुंबईचे संस्थापक विश्वस्त अविनाश भानुदास आव्हाड हे मार्गदर्शक मान्यवरदेखील उपस्थित असतील. अभिनेता संकर्षण कºहाडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

आपल्या गावात बदल घडविण्यासाठी प्रत्येक सरपंच धडपड करत असतो. याचीच नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सरपंच अवॉर्डचा पायंडा पाडला. सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा राज्यातील व पंचायत राज्य व्यवस्थेतील हे मानाचे पुरस्कार म्हणून ओळखले जातात. आत्ताच्या परिस्थितीत गावकऱ्यांचा आधार बनून ‘लोकमत’ पुन्हा आपल्याशी संपर्क साधत आहे. या वेबिनारमध्ये आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील व पंचायत समिती सदस्य सहभागी होऊ शकतात.

येथे करा नोंदणी
बीकेटी टायर्सतर्फे सादर करण्यात येत असलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://bit.ly/SarpanchKharaYodha या लिंक वर नोंदणी करा.

Web Title: ‘Sarpanch Khara Yodha’ webinar for in villages lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत