मुंबई : ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द इअर पुरस्कारांची गुरुवारी घोषणा होणार आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या समारंभात सरपंचांना गौरविले जाईल.‘लोकमत’ने दोन वर्षापूर्वी हा पुरस्कार सुरू केला. याआधी १८ जिल्ह्यांत सरपंचांना गौरविण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय सोहळा होत आहे. बीकेटी टायर्स मुख्य प्रायोजक आहेत.सोहळ्याला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, सहकार राज्यमंत्री डॉ़ विश्वजीत कदम, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, लोकमत मीडियाचे अध्यक्ष विजय दर्डा, अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अमेय वाघ, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांच्या हस्ते सरपंचांना १३ विभागांत हे पुरस्कार देण्यात येतील.
मुंबईत आज ठरणार लोकमत ‘सरपंच ऑफ द इअर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 07:28 IST