मुंबईत उद्या ‘सरपंच ऑफ द ईअर’चा सोहळा रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:44 AM2020-01-08T04:44:50+5:302020-01-08T04:44:58+5:30
यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि़९) सकाळी ११ वाजता ‘सरपंच ऑफ द ईअर’चा मानाचा मुकूट सरपंचांच्या डोक्यावर विराजमान होणार आहे.
मुंबई : येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि़९) सकाळी ११ वाजता ‘सरपंच ऑफ द ईअर’चा मानाचा मुकूट सरपंचांच्या डोक्यावर विराजमान होणार आहे़ भव्य सोहळ्यात सरपंचांना गौरविण्यात येणार आहे़ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक, सहकारमंत्री डॉ़ विश्वजित कदम, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राज्यभरातील सरपंचांचा ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ने गौरव करण्यात येणार आहे़
‘लोकमत’ समूहाने गत दोन वर्षांपासून सरपंचांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत सरपंच आॅफ द इयर’ हा पुरस्कार सुरु केला़ बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. दुसऱ्या वर्षात राज्यातील ५ हजार ६१४ सरपंचांनी या पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन ‘लोकमत’कडे सादर केले होते़ राज्यातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या १८ जिल्ह्यांमधील सरपंचांना जिल्हास्तरावर गौरविण्यात आले आहे़
जिल्हास्तरावरील सर्व विजेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे़ जिल्हास्तरावरील विजेत्यांमधून राज्यस्तरीय ‘सरपंच आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी
नामांकने आलेली होती़ तज्ज्ञ
ज्युरी मंडळाने या नामांकनांची छाननी करुन राज्यस्तरीय विजेत्यांची निवड केली आहे़
सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीत केलेल्या कामांची दखल घेऊन
प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द इयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत.
असे एकूण तेरा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत़
पुरस्कार प्रदान कार्यक्रमातच विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे़ त्यामुळे ९ जानेवारी
रोजी कार्यक्रस्थळीच विजेते जाहीर होणार आहेत़
>सिनेकलाकारांची राहणार उपस्थिती
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यातील सिनेकलाकारांची उपस्थिती विशेष आकर्षण असणार आहे़ धुरळा या मराठी चित्रपटातील अभिनेते अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर असे दिग्गज कलाकार सरंपचांना गौरविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत़