नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘अ डील’ची सरशी

By संजय घावरे | Published: October 20, 2023 08:31 PM2023-10-20T20:31:56+5:302023-10-20T20:32:40+5:30

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Sarshi of 'A Deal' in the one act competition under the branch of Natya Parishad | नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘अ डील’ची सरशी

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘अ डील’ची सरशी

संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. नाशिक शाखेची 'अ डिल' एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. अमरावती शाखेच्या 'मधूमोह' या एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर इचलकरंजी शाखेच्या 'हा वास कुठून येतो' या एकांकिकेस उत्तम तर अहमदनगर शाखेच्या 'जाहला सोहळा अनुपम' या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. 

पारितोषिक वितरण नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त अशोक हांडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेत्री व नियामक मंडळ सदस्य निलम शिर्के-सामंत, सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष विजय गोखले, अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक नाशिक शाखेचे आनंद जाधव यांना उत्कृष्ट दिग्दर्शन दीपक नांदगावकर, अमरावती शाखा यांना तर उत्तम दिग्दर्शक पारितोषिक इचलकरंजी शाखेचे अनिरूद्ध दांडेकर यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक विश्वंभर पईरवाल व पूजा पुरकर, नाशिक यांना तर उत्कृष्ट अभिनयासाठी हर्षद ससाणे व वैष्णवी राजभूरे, अमरावती यांना तर उत्तम अभिनयासाठी प्रतीक हुंदारे व मानसी कुलकर्णी, इचलकरंजी यांना पारितोषिक देण्यात आले. तर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र सौरभ कुलकर्णी अहमदनगर, अशोक किल्लेदार सोलापूर, ॲड. दीपक शर्मा अहमदनगर, अभिषेक लोले इचलकरंजी, विजयालक्ष्मी कोकणे सोलापूर, अपर्णा जोशी, सोलापूर यांना देण्यात आले. नेपथ्यसाठी सर्वोत्कृष्ट निखिल शिंदे इचलकरंजी, उत्कृष्ट नेपथ्य रोहित जाधव नाशिक, उत्तम नेपथ्य अमोल खोले, अहमदनगर यांना तर प्रकाशयोजनेसाठी उत्तम पारितोषिक अनिरुद्ध दांडेकर इचलकरंजी, उत्कृष्ट पारितोषिक ॲड.चंद्रशेखर डोरले, अमरावती तर सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पारितोषिक कृतार्थ कंसारा, नाशिक यांना देण्यात आले. पार्श्वसंगीत उत्तम पारितोषिक प्रवीण लायकर इचलकरंजी, उत्कृष्ट पारितोषिक मिलिंद कहाळे अमरावती तर पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पारितोषिक ओम देशमुख, नाशिक यांना देण्यात आले. 

याप्रसंगी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे म्हणाले, महाराष्ट्रातील हौशी, प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे कलावंत खूप मेहनतीने काम करतात. मुंबई येथील व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना कलावंतांच्या निवासाची व्यवस्था मुंबईत होत नाही. याकरिता परिषदेच्या माध्यमातून निवास व्यवस्थेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

Web Title: Sarshi of 'A Deal' in the one act competition under the branch of Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई