दीनदुबळ्यांच्या मदतीला धावणारे सर्वोदय मंडळ 

By सचिन लुंगसे | Published: September 26, 2023 01:10 PM2023-09-26T13:10:11+5:302023-09-26T13:11:57+5:30

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरातील तलाव चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (सर्वोदय मित्रमंडळ) ७३ वर्षे पूर्ण झाली

Sarvodaya Mandal running to help the poor | दीनदुबळ्यांच्या मदतीला धावणारे सर्वोदय मंडळ 

दीनदुबळ्यांच्या मदतीला धावणारे सर्वोदय मंडळ 

googlenewsNext

मुंबई :

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरातील तलाव चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (सर्वोदय मित्रमंडळ) ७३ वर्षे पूर्ण झाली असून, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात या मंडळाने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यापासून आदिवासी पाड्यांना हातभार लावतानाच मंडळाने कायमच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या जगण्याला बळ दिले आहे. विशेषत: अत्यंत शिस्तबद्ध असे कार्यकम्र, उपक्रम आयोजित करण्यात मंडळाचा हातखंडा असून, आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे मंडळाचा राज्यभरात नावलौकिक आहे.

मूर्तिकार अरुण दाते यांच्या हस्ते मंडळाच्या श्रीगणेशाची मूर्ती साकारली जात असून, मंडळाने उभारलेला देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी रीघ लागते. विशेषत: भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास असे अनेक विषय मंडळाने देखाव्यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात साकारले असून, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मंडळाचे मोठे नाव आहे. मंडळाकडून होणाऱ्या उपक्रमांचे नेहमीच कौतुक केले जाते. हा वारसा असाच पुढे सुरू ठेवण्याचा मंडळाचा निर्धार आहे.

एक वही, एक पेन
गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमाअंतर्गत जमा झालेले साहित्य कुर्ला येथील गाडगे महाराज वसतिगृहासोबत कर्जतमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले.

  ज्येष्ठ नागरिकांद्वारे श्रीगणेश चरणी अभिषेक सेवा
  लहान मुलांसाठी श्रीगणपत्यथर्वशीर्ष
  पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता व प्लास्टीक पिशव्यांना आळा बसावा, म्हणून महिला सदस्यांना कापडी पिशव्यांचे वितरण
  विद्यार्थी दत्तक योजना
 कबड्डी स्पर्धांचे आयोजन

कार्यकारिणी २०२२ ते २०२५
अध्यक्ष - जयप्रकाश परब
उपाध्यक्ष - अतुल कदम
सरचिटणीस - जगदीश सावंत
सहचिटणीस - अभिजीत परब
खजिनदार - सुधीर कदम
उपखजिनदार - अभिषेक परब

कार्यकारिणी सदस्य
राजेंद्र देशमुख, रजित करकेरा, प्रसाद कदम, शिरीष हडकर, विलास गांगण

प्रमुख सल्लागार
प्रकाश देशमुख, रामचंद्र भोगले, संजय देशमुख, चंद्रकांत घाडी, राजेश परब

  बाबा आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदत करण्यात आली.
  २०२२ - गेल्यावर्षी फूटपाथवासीयांना दिवाळी फराळाचे वाटप
 आदिवासी पाड्यात सुमारे २ ट्रक कपड्यांचे वाटप
  ‘एक वही, एक पेन’ या आवाहनाला उदंड प्रतिसाद, सुमारे ३,५०० ते ४ हजार वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप
 मुंबई पातळीवर गणेशोत्सव स्पर्धेत सर्वांत जास्त बक्षिसांची लयलूट करणारे एक अग्रेसर मंडळ

Web Title: Sarvodaya Mandal running to help the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.