सर्वोदय मंडळाची सोशल मीडियावर ‘गांधीगिरी’
By admin | Published: July 8, 2016 04:06 AM2016-07-08T04:06:55+5:302016-07-08T04:06:55+5:30
महात्मा गांधी म्हटले की आताच्या पिढीला ‘मुन्नाभाई’मधले ‘बापू’च आठवतात. आताची पिढी महात्मा गांधींच्या विचारापासून दुरावली आहे, त्यामुळे गांधींचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचतच नाही.
- स्नेहा मोरे , मुंबई
महात्मा गांधी म्हटले की आताच्या पिढीला ‘मुन्नाभाई’मधले ‘बापू’च आठवतात. आताची पिढी महात्मा गांधींच्या विचारापासून दुरावली आहे, त्यामुळे गांधींचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचतच नाही. याच विचारावर कृतिशील पाऊल उचलत मुंबई सर्वोदय मंडळाने तरुणाईला त्यांच्याच भाषेत शिकवण्याचा विडा उचलला आहे. रात्रंदिवस स्मार्टफोन्समध्ये डोकं खुपसून फिरणाऱ्या या पिढीला आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘गांधीगिरी’ शिकवण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षे सर्वोदय मंडळाच्या वतीने जगभरातील लाखो नागरिकांमध्ये गांधींचे विचार रुजविले जातात. ‘थॉट फॉर द डे’या संकल्पनेंतर्गत ई-मेल्सच्या माध्यमातून गांधीजींचे विचार पाठविले जातात. आता याच धर्तीवर व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या माध्यमातूनही असाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती सर्वोदय मंडळाच्या ँ३३स्र://६६६.े‘ँल्लँ्रि.ङ्म१ या संकेतस्थळावर आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व, दहशतवाद, दिशाहीन तरुण शक्ती, निराधार ग्रामीण, आत्महत्या करणारा शेतकरी या सगळ्या समस्यांमुळे भविष्यात कित्येक भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल हे ओळखून अहिंसक मार्गाचा अवलंब करण्यासाठी महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश यांच्या विचारधारेचा आधार घेऊन १९५७ मध्ये ‘मुंबई सर्वोदय मंडळ’ची स्थापना झाली. त्यानंतर १९८२ मध्ये ‘गांधी बुक सेंटर’ची स्थापना झाली. या माध्यमातून संपूर्ण भारतातील तरुणांना एकत्र करून शांती, गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रसार व्हावा हा या मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.