झोपडपट्टीच्या सॅटेलाइट छायाचित्रामुळे क्लस्टर सीमा निश्चित करता येणार; प्रत्येक झोपडीचा युनिक आयडी... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:36 AM2024-10-15T08:36:33+5:302024-10-15T08:46:24+5:30

झोपडपट्टी क्लस्टर सीमांना युनिक आयडी दिले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वॉर्डसीमांचा आधार घेतला आहे. 

Satellite photographs of slums can determine cluster boundaries; Unique ID of each hut by SRA | झोपडपट्टीच्या सॅटेलाइट छायाचित्रामुळे क्लस्टर सीमा निश्चित करता येणार; प्रत्येक झोपडीचा युनिक आयडी... 

झोपडपट्टीच्या सॅटेलाइट छायाचित्रामुळे क्लस्टर सीमा निश्चित करता येणार; प्रत्येक झोपडीचा युनिक आयडी... 

झोपडपट्टी क्लस्टर सीमा टोपोग्राफिक सर्वेक्षणाद्वारे झोपडपट्टी क्लस्टर सीमा निश्चित केल्या आहेत. तसेच या अंतिम करणे अथवा यात बदल करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांनाच आहेत. या झोपडपट्टी क्लस्टर सीमांना युनिक आयडी दिले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वॉर्डसीमांचा आधार घेतला आहे. 

झोपडी क्रमांक 
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सर्वेक्षक प्रत्येक झोपडीस एक झोपडी क्रमांक देतात. तो झोपडी क्रमांक झोपडीच्या दर्शनी भागात ऑइलपेंटने लिहिला जातो. झोपडी क्रमांक हा युनिक आयडी असतो. त्यामध्ये प्रथम ती जी झोपडी ज्या क्लस्टरमध्ये येते त्याचा क्लस्टर आयडी असतो. त्यापुढे पाच डिजिटपर्यंतचे नंबर दिले जातात. या झोपडी क्रमांकाद्वारेच त्या झोपडीचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे एकत्रीकरण केले जाते. 

बायोमेट्रिक सर्वेक्षण 
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण मोबाइल अॅपच्या द्वारे टॅब्लेट संगणक वापरुन झोपडपट्टीधारकाची व त्याच्या कुटुंबाची माहिती संकलित केली जाते. झोपडपट्टीधारकाची व त्याच्या कुटुंबाची आधार पडताळणी केली जाते. झोपडपट्टीधारकाच्या पात्रतेसाठी आवश्यक (विद्युत देयक, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, गुमास्ता, 2000 सर्वेक्षण पावती इत्यादी) कागदपत्रे छायाचित्र स्वरुपात तसेच हार्ड कॉपी स्वरूपात संकलित केली जाते. 

झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणाली 
बायोमेट्रिक सर्वेक्षणाद्वारे प्राप्त सर्व माहिती झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये संकलित होते. झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणालीद्वारे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे नियोजन तसेच देखरेख केली जाते. झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये सर्वेक्षणाद्वारे प्राप्त कागदपत्रे व माहितीची गुणवत्ता तपासणी केली जाते. झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणालीमधील डॅशबोर्डद्वारे सर्वेक्षणाची सद्यस्थिती व प्रगती दिसते. 

झोपडपट्टी आयडीनुसार झोपडपट्टीधारकांची माहिती 
झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये झोपडपट्टी आयडीनुसार झोपड़पट्टीधारकांची माहिती पाहता येते. झोपडपट्टीधारकाने दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे पाहता येतात. झोपडीच्या आतून घेतलेला व्हिडिओ व झोपडीधारकाचा व्हिडिओ पाहता येतो. गहाळ दस्तऐवज अपलोड करता येतात झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये झोपडपट्टीधारकाची काही कागदपत्रे बायोमेट्रिक सर्वेक्षणावेळी घेतली गेली नसतील तर ती कागदपत्रे पुन्हा अपलोड करता येतात.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्याः http://sra.gov.in/

Web Title: Satellite photographs of slums can determine cluster boundaries; Unique ID of each hut by SRA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.