सॅटीसचा श्वास गुदमरतोय

By admin | Published: September 13, 2014 10:47 PM2014-09-13T22:47:37+5:302014-09-13T22:47:37+5:30

स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी फुटावी आणि ठाणोकरांच्या सुखकर प्रवासासाठी सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली.

Satias breathing breath | सॅटीसचा श्वास गुदमरतोय

सॅटीसचा श्वास गुदमरतोय

Next
ठाणो : स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी फुटावी आणि ठाणोकरांच्या सुखकर प्रवासासाठी सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु, सध्या तो फेरीवाले, प्रेमी युगुल, गदरुल्ले यांना आंदण दिल्याचा भास होत आहे. परंतु, याकडे पालिका कानाडोळा करीत असून रेल्वे प्रशासनाने आपले हात आखडते घेतले आहेत. 
ठाणो स्टेशन परिसरात टीएमटी बससाठी 2क्क्9 मध्ये सॅटीस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्यास मदत झाली. तसेच येथील फेरीवालेसुद्धा हटवण्यात आले होते. परंतु, आता काही वर्षातच या सॅटीसला काहीसे ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सॅटीसला असलेल्या जिन्याच्या पाय:या निखळल्या असून त्यावरून चालताना पादचा:यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सॅटीसवरसुद्धा काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातही बससाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या आजूबाजूला गराडा घालून ईल चाळे करणा:या प्रेमी युगुलांच्या लीलांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रवासीदेखील संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशाला थेट सॅटीसवर जाता यावे, यासाठी फलाट क्रमांक-2 हा थेट सॅटीसला जोडण्यात आला आहे. त्यामुळे बसमधून उतरलेल्या प्रवाशांना याच मार्गावरून रेल्वे पकडण्यासाठी सोयीचे झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची या ठिकाणी गर्दी झालेली दिसते. रेल्वेच्या हद्दीतील या पुलावर सध्या फेरीवाल्यांनीही गराडा घातला आहे. त्यांनी हा भाग व्यापल्याने येथून ये-जा करणा:या प्रवाशांना खासकरून महिला आणि तरुणींना याचा नाहक त्रस सहन करावा लागत आहे. या बाजूला उभे असलेले रेल्वे पोलीसही बघ्याची भूमिका घेत  आहेत. (प्रतिनिधी)
 
नियमानुसार फेरीवाल्यांवर जी काही कारवाई करणो शक्य आहे, ती केली जाईल. तसेच सॅटीस प्रकल्प हा पूर्णपणो फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

 

Web Title: Satias breathing breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.