सतीश काळसेकर स्मृतिजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:07+5:302021-08-01T04:06:07+5:30
मुंबई दिवंगत ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्या मित्रपरिवारातील काहीजणांनी एकत्र येऊन, सतीश काळसेकर यांच्या स्मृतींच्या आठवणींचा कार्यक्रम २ ते ...
मुंबई
दिवंगत ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्या मित्रपरिवारातील काहीजणांनी एकत्र येऊन, सतीश काळसेकर यांच्या स्मृतींच्या आठवणींचा कार्यक्रम २ ते ५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केला आहे. फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर अशा विविध समाजमाध्यमांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
या अंतर्गत, २ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ विचारवंत व जागतिक साहित्याचे अभ्यासक एजाज़ अहमद यांचे 'आय कान्ट ब्रीद' या विषयावरील व्याख्यान आहे. ३ ऑगस्ट रोजी 'सतीश काळसेकर आणि लघुअनियतकालिक चळवळ' या विषयावरील परिसंवादात चंद्रकांत पाटील, अर्जुन डांगळे, कुमार केतकर व भालचंद्र नेमाडे सहभागी होणार आहेत.
४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कविसंमेलनात राजेश जोशी, अरुण कमल, कुमार अम्बुज, संजय भिसे, बसंत त्रिपाठी, वसंत आबाजी डहाके, वसंत दत्तात्रेय गुर्जर, प्रभा गणोरकर, गुरुनाथ सामंत, मलिका अमरशेख, प्रज्ञा दया पवार, नीळकंठ कदम, प्रवीण बांदेकर, किरण येले, आनंद विंगकर, वर्जेश सोलंकी, रमेश इंगळे उत्रादकर, श्रीधर नांदेडकर, विकास पालवे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. तर, ५ ऑगस्ट रोजी 'आठवणीतले काळसेकर' या अभिवादन सभेत उदय प्रकाश, विजय कुमार, जितेंद्र भाटिया, डॉ. रत्नशंकर पांडे, रंगनाथ पठारे, सुमती लांडे, जयप्रकाश सावंत, दौलतराव हवालदार, डॉ. भालचंद्र कानगो, प्रकाश बुरटे, सुधीर पटवर्धन, ऊर्मिला पवार, डॉ. रणधीर शिंदे हे मान्यवर सहभाग घेणार आहेत. हे सर्व कार्यक्रम 'प्रत्यय'च्या फेसबुक पेजवरून तसेच यूट्युब चॅनलवरून प्रसारित केले जाणार आहेत.