लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक संचालकपदी सतीश करपे यांची नियुक्ती करण्यात आली असून, १२ मे रोजी करपे यांनी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. करपे हे यापूर्वी भांडुप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते, तसेच त्यांच्याकडे कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक संचालक पदाचा प्रभारी कार्यभारही आठ महिन्यांहून अधिक काळ होता.सतीश करपे यांनी यापूर्वी नागपूर, भांडुप आणि नांदेड या परिमंडलात मुख्य अभियंता म्हणून काम पाहिले आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत भांडुप, कल्याण, रत्नागिरी आणि नाशिक या चार परिमंडलांचा समावेश असून, या प्रादेशिक कार्यालयात एकूण ४४ वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असणार आहेत. दरम्यान, महावितरणच्या नव्याने स्थापन झालेल्या नागपूर, पुणे, कोकण आणि औरंगाबाद या चार प्रादेशिक विभागांमुळे बहुतांश निर्णय हे स्थानिक पातळीवर घेतले जात असून, ग्राहकांचे प्रश्न सोडवले जात आहेत. परिणामी, ग्राहकांना, तसेच अधिकारी वर्गाला प्रत्येक वेळी मुख्यालयाला जावे लागणार नाही. तथापि, धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यालयाकडेच आहे.
सतीश करपे संचालकपदी
By admin | Published: May 13, 2017 1:31 AM