गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 12:44 PM2021-04-05T12:44:44+5:302021-04-05T12:45:55+5:30

धारावी नंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे.दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 19 वर्षीय सत्यम यादव या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे.

Satyam Yadav, 19, of Ganpat Patil Nagar has been selected for the Army | गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड 

गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड 

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई - धारावी नंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे.दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 19 वर्षीय सत्यम यादव या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे. सत्यमचे वडील एका खाजगी कंपनीत कामाला असून आई गृहिणी आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सत्यमने अभ्यास केला. बोरीवलीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर सत्यम याने भारतीय सैन्य दलात जाण्याचा विचार केला. त्याच्या या निर्णयाचे आई-वडिलांनी देखील स्वागत केले. 

शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी काल सत्यमच्या घरी जाऊन त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच यापुढे सत्यमला कोणतीही मदत लागल्यास आपण कार्यरत असल्याचे  त्यांनी सांगितले. गणपत पाटील नगर सारखा लोकवस्तीत राहून सत्यमने भारतीय सैन्य दलात प्रवेश करून युवकांपुढे आदर्श निर्माण केल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. 

 सत्यमने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देत असल्याचे सांगितले. तसेच येथील उद्यानात आपल्या कवायतीसाठी जादा वेळ दिला जात असल्याचे त्याने सांगितले. सत्यम सध्या नाशिक येथे भारतीय सैन्यदलाच्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. त्याच्या मोबाईलवर असलेली 'हिंदुस्तान मेरी आन , मेरी शान मेरी जान हिंदुस्तान' ही रिंगटोन त्याच्या देश प्रेमाबद्दल बरच काही सांगून जाते. तर आपल्या मुलाची भारतीय सैन्य दलात झालेल्या निवडीबद्दल आपणास अभिमान असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले.
 

Web Title: Satyam Yadav, 19, of Ganpat Patil Nagar has been selected for the Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.