डोंबिवली / पोर्ट ब्लेअर : सावरकर म्हणजे एका मानवी देहात वसलेले विविध अवतार होय, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. स्वा. सावरकरांच्या ४९ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित समारोहात ते बोलत होते. सेल्युलर तुरुंगात अनेक देशभक्तांनी नाना प्रकारच्या यातना भोगल्या. त्यांनी सांडलेले रक्त, घाम व अश्रूंमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हा इतिहास आजच्या युवा पिढीसमोर यायला हवा, तरच मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल समजेल. या प्रसंगी त्यांनी मार्शेल्सची उडी आणि अंदमानपर्व यावर प्रकाशझोत टाकला. तत्पूर्वी रेणुका भिरंगी या सातवीत शिकणााऱ्या चिमुरडीने सावरकरांच्या ‘सं. उत्तरक्रिया’ या नाटकातील ह्यवेडीह्णचा प्रवेश उत्तमरीत्या साकारला. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी ह्यसागरा प्राण तळमळलाह्ण या कवितेचे रसग्रहण सांगून ते काव्य म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन श्रोत्री यांनी केले. अंदमानमधील मराठी लोक आणि विविध यात्रा कंपन्यांसोबत आलेल्या मराठीजनांमुळे सभागृह भरगच्च भरले होते. (प्रतिनिधी)
सावरकर म्हणजे देहात वसलेले विविध अवतार
By admin | Published: March 02, 2015 10:54 PM