नोकराने पळवले सव्वाकोटी रुपये, आयकर विभागाकडून मालकाची चौकशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:03 AM2017-09-12T05:03:44+5:302017-09-12T11:45:40+5:30

मालकाच्या सव्वा कोटीच्या रकमेवर नोकरानेच डल्ला मारल्याची घटना घडली. याप्रकणी नोकराला अटक करण्यात आली. यासीन अब्दुल शाहीद शेख असे अटक नोकराचे नाव आहे. त्याच्याकडून एवढ्या मोठ्या रकमेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही सव्वा कोटी रक्कम लकडवाला यांनी कोठून आणली? आणि ही रक्कम ते कोणाला देणार होते? याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली.

 Savarkar's Savarkar, the owner's inquiry from the income tax department | नोकराने पळवले सव्वाकोटी रुपये, आयकर विभागाकडून मालकाची चौकशी  

नोकराने पळवले सव्वाकोटी रुपये, आयकर विभागाकडून मालकाची चौकशी  

googlenewsNext

मुंबई : मालकाच्या सव्वा कोटीच्या रकमेवर नोकरानेच डल्ला मारल्याची घटना घडली. याप्रकणी नोकराला अटक करण्यात आली. यासीन अब्दुल शाहीद शेख असे अटक नोकराचे नाव आहे. त्याच्याकडून एवढ्या मोठ्या रकमेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही सव्वा कोटी रक्कम लकडवाला यांनी कोठून आणली? आणि ही रक्कम ते कोणाला देणार होते? याबाबत पोलिसांनी चौकश्ी सुरू केली. आयकर विभागही याबाबत चौकशी करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील परिसरात राहत असलेले व्यावसायिक जाफरअली लकडावाला (५२) यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. डोंगरी परिसरातील पुना स्ट्रीटवरून गोव्याला जाण्यासाठी सुटणाºया भगवती ट्रॅव्हल्स या गाडीवर गोव्यातील एका नातेवाईकाला पाठविण्यासाठी लकडावाला यांनी शनिवारी सायंकाळी पार्सल दिले होते. पार्सलमध्ये डिनरसेट असल्याचे सांगून त्यांनी ते पुढे पाठविले होते. त्याच दरम्यान शेखने ते पार्सल लकडवाला यांनी परत मागितल्याचे सांगितले. लकडवाला यांनी त्यात डिनरसेट असल्याचे सांगितल्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीने त्या बॉक्सकडे अधिक लक्ष दिले नाही. त्यांच्या नोकराकडे बॉक्स दिला. त्याने तो लपवून ठेवला. बॉक्स गायब झाल्याचे लक्षात येताच लकडावाला यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डिनरसेटसह ३ लाख रुपये चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सर्वच नोकरांची चौकशी सुरू केली. त्यावेळी यासीनच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेत आल्या. चौकशीअंती त्यानेच बॉक्स पळवल्याचे समजले. यासीनने पोलिसांना दिलेल्या माहितीत बॉक्समध्ये १ कोटी २२ लाख रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. लकडावाला यांनी या रकमेबाबत गुप्तता का पाळली? त्यांनी ही रक्कम कोठून व कशी आणली? ते हे पैसे कोणाला पाठविणार होते? याबात पोलिसांसह आयकर विभागही चौकशी करत आहेत.

Web Title:  Savarkar's Savarkar, the owner's inquiry from the income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.