लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक कन्यादिनाचे औचित्य साधून पॉलिडियम ऑटोमोबाईल या संस्थेतर्फे रविवारी बोरीवली ते केळवे अशी बाईक रॅली काढण्यात आली. बेटी बचाओ, बेटी पढाओ, असा संदेश यावेळी देण्यात आला.
रॅली केळवे येथे पोहोचल्यानंतर मुलींनी पथनाट्य सादर केले. गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे, ते करू नका, मुलगा आणि मुलगी समान आहेत, असा संदेश त्यातून देण्यात आला. या रॅलीत दीडशे बाईक रायडर्स सहभागी झाले होते. त्यात मुलींचा सहभाग लक्षणीय होता.
पॉलिडियम ऑटोमोबाईलतर्फे वर्षातून ३० बाईक रॅली काढून स्त्री अत्याचार, कर्करोग अशा विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. मुख्यत: गावांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम राबविली जाते, असे संस्थेचे प्रमुख मयूर जैन यांनी सांगितले.
बाईक रॅली काढून जनजागृती करण्याची मोहीम पाचजणांनी एकत्र येऊन सुरू केली. या मोहिमेला आता २५० रायडर्स जोडले गेले आहेत. प्रत्येकजण स्वेच्छेने यात सहभागी होतो. खर्च करतो. समाज प्रबोधन व जनजागृती हा एकमेव हेतू या राइड्स मागे असतो, असेही जैन यांनी सांगितले.
.......
फोटो मेल केला आहे