‘त्या’ महिलेसाठी ‘सेव्ह इमान कॉझ’ कॅम्पेन

By admin | Published: January 4, 2017 04:36 AM2017-01-04T04:36:50+5:302017-01-04T04:36:50+5:30

इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर लवकरच मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक

'Save Eman Cause' campaign for 'that' woman | ‘त्या’ महिलेसाठी ‘सेव्ह इमान कॉझ’ कॅम्पेन

‘त्या’ महिलेसाठी ‘सेव्ह इमान कॉझ’ कॅम्पेन

Next

मुंबई : इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर लवकरच मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला ही शस्त्रक्रिया करणार आहेत. याकरिता, डॉ. लकडावाला यांच्या पुढाकाराने फेसबुक आणि टिष्ट्वटर या सोशल साइट्सवर ‘सेव्ह इमान कॉझ’ हे कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे.
‘सेव्ह इमान कॉझ’च्या माध्यमातून इमानला भारतात आणण्यापासून ते तिच्या शस्त्रक्रियेपर्यंतचा प्रवास ही एक चळवळ बनविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. फेसबुकवर ‘सेव्ह इमान कॉझ’ हे विशेष पेज तयार करण्यात आले आहे तर टिष्ट्वटरवरही वेगळे अकाउंट सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून जगभरातील डॉक्टर्स आणि सामान्य इमानच्या मदतीसाठी धावून येत आहेत.
या चळवळीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांच्या तज्ज्ञांना एकसंघ करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. लकडावाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डॉ. लकडावाला सांगतात की, तिच्यावरील शस्त्रक्रिया हे एकट्याचे काम नसून यासाठी टीमवर्कची गरज आहे, त्याप्रमाणे इमानच्या केसस्टडीचा अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. इमानला भारतात आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
इमानच्या सद्य:स्थितीविषयी डॉ. लकडावाला यांनी सांगितले की, स्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात
आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तिला बोलता येत नाही, तिला टाईप-2 डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्चरक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे. (प्रतिनिधी)

इजिप्तमध्ये राहणाऱ्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या
इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्मावेळी तिचे वजन ५ किलो होते.

Web Title: 'Save Eman Cause' campaign for 'that' woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.