Join us

आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 3:11 PM

गेल्या गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेच्या जंगलातील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली.

मनोहर कुंभेजकर

मुंबई--लोकमान्य टिळकांनी १२८ वर्षांपूर्वी श्री गणेशोत्सवाची सुरुवात सार्वजनिक स्वरूपात केली आणि डिव्हाईड व रुल हा ब्रिटिशांचा संकल्प मोडीत काढत समाजोपयोगी संदेश देण्याची तसेच एक निर्भीड चळवळ उभी करण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यातूनच प्रेरणा घेत यावर्षीच्या माहीमच्या वैभव अडुरकर कुटुंबाने गणपतीच्या प्रबोधनपर देखाव्यातून आरे फॉरेस्ट वाचवण्याची साद घातली आहे.

गेल्या गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेच्याजंगलातील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता या विरोधात मोठे आंदोलन उभे राहात आहे.गेल्या रविवारी भर पावसात विविध पर्यावरणवादी संस्थांनी भर पावसात जोरदार मानवी साखळीच्या माध्यमातून सुमारे अडीच तास जोरदार निदर्शने केली होती.आता चक्क घरगुती गणपतीच्या देखाव्यातून आरे वाचवा,जंगल वाचवा असा देखावा माहीमच्या वैभव प्रफुल्ल अडुरकर आणि परिवाराने साकार करून जनजागृती केली आहे.सेव्ह आरे,आरे कंझर्वेशन ग्रुप आणि विविध पर्यावरण संस्थांनी या देखाव्याला सोशल मीडियावर जनजागृती केली आहे.त्यामुळे गणेश भक्तांकडून व पर्यवरणप्रेमीं कडून अडुरकर कुटुंबाचे कोतुक होत आहे.

आरे फॉरेस्ट हा मुंबईचा एकमेव असा हरित पट्टा वाचला पाहिजे, येथील निसर्ग वाचला पाहिजे तिथे वास्तव्याला असलेले वन्यजीवन तिथले वर्षानुवर्षे राहत असलेले आदिवासी बांधव यांचे घर राहिले पाहिजे असा संदेश आम्ही या देखाव्यातून दिल्याचे  अडुरकर कुटुंबियांनी लोकमतशी बोलतांना सांगितले

सेव्ह आरे फॉरेस्ट हा विषय संकेत मोडक यांच्याकडून सुचवला गेला आणि सर्वांनी बहुमताने यावरच देखावा तयार करू असे ठरले. आणि तोही पूर्ण पर्यावरणपूरक अश्या स्वरूपात असलेला. आणि मग काम सुरू झाले सर्व नातेवाईक तयारीत जुंपले आणि दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा समोर आली. आणि सेव्ह आरे फॉरेस्टचा देखावा आम्ही साकार केला असे वैभव वैभव प्रफुल्ल अडुरकर यांनी सांगितले.सजावट ही वैभव अडुरकर, रोहन कारेकर, दिपाली अडुरकर, प्रसाद कारेकर यांनी केली असून देखाव्याचीसंकल्पना ही संकेत मोडक, मयुरी अडुरकर यांची आहे..

टॅग्स :आरेगणेश महोत्सवजंगलगणेशोत्सव