‘जेट’ वाचवा, कर्मचाऱ्यांना न्याय द्या, सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:42 AM2019-05-09T06:42:08+5:302019-05-09T06:42:33+5:30
जेट एअरवेजप्रकरणी सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कामगार सेनतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात धरणे आंदोलन केले.
मुंबई : जेट एअरवेजप्रकरणी सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कामगार सेनतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जेट एअरवेजचे रोजगार गमावलेले शेकडो कर्मचारी सहभाग झाले होते. ‘जेट एअरवेज वाचवा, कर्मचाऱ्यांना न्याय द्या,’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
सरकारने या प्रकरणी तोडगा काढावा, अशी मागणी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी केली. कर्मचाºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही यावेळी महाडिक यांनी केला. जेट एअरवेज वाचवा, कर्मचाºयांना न्याय द्या, कर्मचाºयांचे वेतन द्या, सरकारने हस्तक्षेप करून २२ हजार कर्मचाºयांचा रोजगार वाचवा, अशा घोषणा यावेळी कर्मचारी देत होते.
यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांनी सांगितले की, काहीही झाले, तरी जेट एअरवेजच्या कोणत्याही कर्मचाºयावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना वाºयावर सोडू देणार नाही. केंद्र सरकारने जेटबाबत गांभीर्याने लक्ष घालून जेट एअरवेज पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जेटच्या कर्र्मचाºयांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘प्रश्न २२ हजार कर्मचाºयांचा रोजगाराचा!’
नूर अली लादानी म्हणाले, ‘मी व माझी पत्नी १४ वर्षांपासून जेटमध्ये कामाला आहोत. मी वरिष्ठ केबिन क्रू म्हणून कार्यरत होतो, तर पत्नी अंजूम एअर हॉस्टेस होती. दोघांच्या वेतनावर कर्ज काढून घर घेतले आहे. मात्र, आता वेतन बंद झाल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न आहे. जेट सुरू न झाल्यास जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रश्नी सरकारने समाधानकारक तोडगा काढावा,’ अशी मागणीही त्यांनी केली. जेट बंद झाल्याने २२ हजार कर्मचाºयांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, जेटमध्ये सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त जोडपी कामाला आहेत. कमावत्या दोघांची नोकरी गेल्याने कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे जेटप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करून २२ हजार कर्मचाºयांचा रोजगार वाचवावा, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.