दुर्मीळ अल्बिनो कवड्या सापाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:29+5:302021-07-09T04:06:29+5:30
मुंबई : मुलुंडच्या खिंडीपाडा परिसरातून बुधवारी दुर्मीळ अल्बिनो कवड्या सापाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. खिंडीपाडा येथे राहणारे रोहित बनसोडे ...
मुंबई : मुलुंडच्या खिंडीपाडा परिसरातून बुधवारी दुर्मीळ अल्बिनो कवड्या सापाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. खिंडीपाडा येथे राहणारे रोहित बनसोडे यांना एका मंदिराजवळ हा साप आढळून आला. यावेळी त्यांनी तातडीने सर्पमित्र हसमुख मारुती वळंजू यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करताच अल्बिनो कवड्या साप असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या सापाची सुखरूपपणे सुटका करून वन विभागाला कळविण्यात आले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
अल्बिनो म्हणजे कोड आलेला कवड्या साप. हा साप अतिशय चपळ असून झाडांवर व इतर उंच ठिकाणी सहज चढतो. हा साप माणसाच्या दृष्टीस पडल्यास बहुधा निसटून जाण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याला अडथळा किंवा पकडण्याचा प्रयत्न केल्यास तो उग्र स्वरूप धारण करून प्रहार करतो व कडकडून चावतो; पण हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याचा दंश घातक नसतो. मुंबई परिसरात हा साप आढळल्याने सर्प मित्रांकडून आश्चर्य व्यक्त केले गेले आहे.
फोटो आहे - कवड्या साप