Join us

जोशीमठ होण्यापासून मुंबई वाचवा; माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

By मनोहर कुंभेजकर | Published: January 17, 2023 4:44 PM

तीच परिस्थिती मुंबईचा जोशीमठ होण्यास वेळ लागणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-उत्तरांचल मधील जोशीमठ बद्रीनाथ, औली (पर्यटन स्थळ स्कीइंग साठी प्रसिद्ध ) सुनिल गाव , पिपल कोटी हया भागात जमिनीला तडे गेले , घरे मंदिरे हॅाटेल यांच्या भिंती भेगा पडून ढेपाळत आहे जनजीवन संपुष्टात येईल का असा प्रश्न सर्व विचारत आहे. हा झोन ईको सेन्सिटीव्ह आहे होता हे१९७८ च्या मिश्रा स्मिताने सांगितले होते. पण पर्यटन , हाड्रो ईलेक्ट्रीक प्रोजेक्ट तपोवन विष्णूगड साठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे, ड्रीलींग करून भूभाग उचकटला जात आहे,रस्त्यासाठी पर्वत ब्रेडच्या स्लाईस प्रमाणे कापले गेले आहेत. १९७० साली पहिल्यादा डोंगर खचतआहे असे दिसले त्यानंतर कमिटी नेमली.

औलीला गेल्या ५वर्षात कोवीडचा काही काळ वगळता लाखो पर्यटक जतात,त्यामुळे हॅाटेल्स बांधकामे वाढली वाहाने वाढली ईंधन जळल्याने प्रदूषण वाढले ईकॅालॅाजीकली सेन्सीटीव्ह असलेल्या औली जोशीमठ परिसर दररोज काही मि.मि.ने खचत आहे. तीच परिस्थिती मुंबईचा जोशी मठ होण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे याकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केली आहे.

मेट्रोचे प्रचंड काम भुयारी मार्ग प्रचंडधूळ ,व्हेहीक्युलर पोल्युशन, समुद्राच्या लाटाची पातळी मुंबंईच्या किनार पट्टीवर सतत आदळणारी वादळे , कोवीडनंतर बेसुमार वाढलेली बांधकामे त्याना नियमात लवचिकता आणून दिलेल्या परमीशन्स डेब्रिज वाहणारे डम्पर त्यातून ओसंडत ऱ्जाणारी माती सिमेंट याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर मुंबई  टिकणार नाही.त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याकडे जातीने  लक्ष द्यावे अशी  विनंती त्यांनी केली आहे.

पोल्युशन कंट्रोल बोर्ड केवळ डॅाक्टर हॅास्पिटल यांना टार्गेट करते मग बिल्डर कचरा हॅाटेलची घाण प्लॅस्टीक फेकणारे कसे सुटतात असा ही सवाल ही त्यांनी केला.मेट्रो च्या कामाचे पर्यावरण व सेसमॅालॅाजी च्या दृष्टीकोनातून तसेच मुंबई एक बेट आहे याचा अभ्यास करून विकास करावा असे मत डॅा.दीपक सावंत यानी व्यक्त केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :दीपक सावंत