Join us  

मुंबईतल्या विहिरींचे जतन करा - मुख्यमंत्री

By admin | Published: January 28, 2016 3:25 AM

राज्यात झालेल्या कमी पावसामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असून, मुंबईतील चार हजार विहिरींसह संपूर्ण राज्यातील छोट्या-मोठ्या जलस्रोतांचे कोणत्याही

मुंबई : राज्यात झालेल्या कमी पावसामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असून, मुंबईतील चार हजार विहिरींसह संपूर्ण राज्यातील छोट्या-मोठ्या जलस्रोतांचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण आणि जतन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सांताक्रूझ येथील लायन्स क्लब मैदानावर अभियान या संस्थेतर्फे आयोजित उत्तर प्रदेश स्थापना दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संस्थेच्या ‘विहीर वाचवा, पाणी मिळवा’ या उपक्रमाचा आरंभही केला. यावेळी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष प्रा. नंदलाल पाठक यांना डॉ. राम मनोहर त्रिपाठी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. योगायतन समूहाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह यांना उत्तर उद्योग श्री, अरविंद राही यांना उत्तर साहित्य श्री, सुरेश शुक्ल यांना उत्तर कला श्री, मनपाचे शिक्षण अधिकारी जयश्री यादव यांना उत्तर शिक्षा श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भाजपाचे महाराष्ट्र संघटन महामंत्री रवींद्र भुसारी, खासदार पूनम महाजन, लखनौचे आमदार गोपाल टंडन, मुंबई अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, महामंत्री अमरजित मिश्र आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)