‘तो’ यापूर्वीही तिच्या खोलीत शिरला होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:37 AM2023-06-09T08:37:24+5:302023-06-09T08:38:18+5:30

याबाबत वॉर्डनला सांगण्यास घाबरत असल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितले आहे.  

savitri devi phule hostel murder case he had entered her room before | ‘तो’ यापूर्वीही तिच्या खोलीत शिरला होता...

‘तो’ यापूर्वीही तिच्या खोलीत शिरला होता...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : चर्नी रोड हत्या आणि अतिप्रसंगाच्या प्रकरणात तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीत, आरोपी ओमप्रकाश कनोजिया याने पीडित तरुणीच्या थेट रूममध्ये शिरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या चार ते पाच दिवसांपूर्वी याबाबत तिने मैत्रिणीला सांगितले. मात्र, याबाबत वॉर्डनला सांगण्यास घाबरत असल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितले आहे.  

पीडित मृत तरुणीच्या मैत्रिणीलाही या घटनेचा धक्का बसला आहे. ती पुण्याची असून फोर्ट येथील एका कॉलेजमध्ये मास्टर इन डाटा सायन्सचे शिक्षण घेत आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीत, दोघीही अनेकदा सोबतच जेवण करत असायच्या. काही सामान आणायचे असल्यास सोबत ये-जा असायची. घटनेच्या चार दिवसांपूर्वी त्या मुलीने कनोजियाच्या अत्याचाराला वाचा फोडली. कनोजियाने १५ दिवसांपूर्वी थेट खोलीत शिरून लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत  होता. याबाबत, मैत्रिणीने वॉर्डनला सांगण्याचा सल्लाही दिला. मात्र, वाॅर्डनला सांगण्यास ती घाबरत होती. तसेच मैत्रिणीनेही वाॅर्डनला सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाॅर्डननेही आपल्याला याबाबत कुठलीही तक्रार आली नसल्याचे नमूद केले आहे.

मुलींना दुसऱ्या हॉस्टेलमध्ये हलविले

सावित्रीदेवी फुले वसतिगृहातील ४० ते ४५ तरुणींना तात्पुरत्या स्वरूपात चर्चगेट येथील तेलंग हॉस्टेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच, मुलींचे समुपदेशनही करण्यात आले आहे. सध्या हॉस्टेलमध्ये कोणीही राहण्यास नाही.

वडिलांची कारवाईसाठी लेखी तक्रार 

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना लेखी तक्रार देत, वसतिगृहाच्या जबाबदार वाॅर्डनसहीत अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांचे पत्र स्वीकारून सर्व बाजूंनी तपास करत त्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


 

Web Title: savitri devi phule hostel murder case he had entered her room before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.