मुंबई : ‘अहो, ओळखलत का?’ म्हणत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दुकलीला मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. माटुंगामधून दोघांवर कारवाई करण्यात आली असून, दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.
अटक केलेले आरोपी हे दिवा, शीळफाटा, कल्याण, डोंबिवली भागात ओळख लपवून राहत होते. चेंबूरमधील रहिवाशाला अशाच प्रकारे नातेवाईक असल्याचे भासवून बोलण्यात गुंतवून त्यांची ५० हजार रुपयांना फसवणूक केली होती. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत, पोलिसांनी तपास सुरू केला.
ही दुकली माटुंगा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या. दोघांनीही मालाड, पंतनगर, आरसीएफ, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, ठाणे भागात गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.