...म्हणे, 'आत्मे माझ्याशी बोलतात, त्यांना हे बाळ नको होतं!'; मुंबईतील वकिलाचे तर्कशून्य तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 02:56 PM2018-07-04T14:56:52+5:302018-07-04T15:09:50+5:30
११ आठवड्यांच्या गरोदर पत्नीला बाळाला जन्म देऊ नये म्हणून या अटक वकिलाने केली मारहाण
मुंबई - मृतांत्म्यासोबत बोलायची सवय आहे आणि मृतात्म्याने हे बाळ तुझ्या आयुष्याची राखरांगोळी करेल असे सांगत असल्याने आरोपी वकील पत्नीस वारंवार गर्भपात करण्यास सांगत होता. मात्र, पत्नीचा यास विरोध असल्याने वकिलाने बेदम मारहाण केली. अशा तर्कशून्य बतावण्या करणाऱ्या मुंबईतील एका वकिलाला कुलाबा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गरोदर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी आणि या मारहाणीत पोटातील बाळ दगावल्याने सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाला अटक केली आहे. ११ आठवड्यांच्या गरोदर पत्नीला बाळाला जन्म देऊ नये म्हणून या अटक वकिलाने दमदाटी करत बेदम मारहाण केली. कारण ३० वर्षीय पेशाने वकील असलेला पतीला मृतात्म्यांसोबत बोलायची सवय आहे आणि मृतात्म्याने त्याला या बाळास पत्नीने जन्म दिला तर ते बाळ तुझ्या आयुष्याची राखरांगोळी करेल असे सांगत असल्याने आरोपी वकील पत्नीस वारंवार गर्भपात करण्यास सांगत होता. असे तक्रारदार पीडित महिलेने कुलाबा पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तक्रारदार महिलेचा मात्र पतीच्या अशा वागण्याला विरोध असल्याने वकिलाने बेदम मारहाण केली. वकील आरोपीने केलेल्या या अजब दाव्यामुळे पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
पत्नीच्या तक्रारीनंतर गरोदर पत्नीला मारहाण करणाऱ्या निर्दयी वकिलाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीमुळे या महिलेचा गर्भपात झाला असून तिने तिच्या पतीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. कुलाबा पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३१५, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनुसार तिच्य पतीला मृतात्म्यांशी बोलण्याची सवय आहे व त्या आत्म्यांच्या सांगण्यावरूनच तो तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र, तिने गर्भपातास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करून तिचा गर्भपात घडवून आणला.
पीडित महिला ही मूळची नवी दिल्लीची असून ती देखील पेशाने सत्र न्यायालयात वकीली करते. तिने मुंबईतच कायद्याचे शिक्षण घेतले. काही महिन्यांपूर्वी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. तिच्या पतीला मृतात्म्यांशी बोलायची विचित्र सवय असल्याचे तिला लग्न झाल्यानंतर समजले. हि महिला गरोदर राहिली त्यानंतर तिचा नवरा मृतात्म्यांशी बोलत असताना त्यातील काहींनी त्याला बायकोचा गर्भपात कर नाहीतर हे बाळ तुझ्या आयुष्यात वाईट गोष्टी घडवेल असे सांगितले. त्यानंतर त्याने बायकोला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, तिचा त्याला विरोध होता. त्यानंतरही तो तिला गर्भपात करण्यासाठी सतत धमकावत होता. मात्र, ती ऐकत नसल्याने एकदा त्याने तिला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर ती तात्काळ नवी दिल्लीला तिच्या माहेरी निघून गेली. मात्र, तिथे गेल्यानंतर तिला रक्तस्त्राव होऊ लागल्याने डॉक्टरांना तिचा गर्भपात करावा लागला. नंतर हि महिला आता मुंबईत परतली असून तिने तिच्या नवऱ्याविरोधात कुलााबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आम्ही वकिलाला अटक केली असून त्याच्याविरोधात मारहाण करणे, जन्माआधीच गर्भातील बाळाची हत्या करणे असे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली.