जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:06 AM2023-10-14T09:06:29+5:302023-10-14T09:08:57+5:30

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयरे यांनी या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Saying that confiscated gold is given cheaply, Rs 10 crores fraud; A case has been registered against four people, including a fake female public prosecutor | जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

मुंबई : सीमाशुल्क विभागात भाऊ अधिकारी असल्याचे सांगत व आपण सरकारी वकील असल्याची बतावणी करत स्वस्तात सोने मिळवून देत असल्याचे सांगून तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह चौघांवर डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार नूतन आयरे (५०) या अंधेरी पश्चिम परिसरातील रहिवासी असून जानेवारी २०२३ मध्ये आयरे यांची आरोपी श्वेता बडगुजर हिच्याशी ओळख झाली. तिने आपण ती सरकारी वकील असून तिचा भाऊ पीयूष प्रधान हा सीमाशुल्क विभागात वरिष्ठ पदावर असल्याचे सांगितले. आयरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले सोने कमी किमतीत मिळवून देऊ शकते असे सांगत त्यांच्याकडून ९ कोटी ८६ लाख रुपये श्वेताने उकळले. तिची साथीदार स्वाती जावकर हिने आणि अन्य दोघांनी रक्कम स्वीकारली. पण आयरे व इतर तक्रारदारांना तिने सोने दिलेच नाही. पुढे त्यांनी घेतलेले पैसेही परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली.

श्वेता सराईत गुन्हेगार
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयरे यांनी या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बडगुजर ही सराईत आरोपी असून तिच्या विरोधात २०१५ मध्ये कांदिवली तसेच ओशिवरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
 

Web Title: Saying that confiscated gold is given cheaply, Rs 10 crores fraud; A case has been registered against four people, including a fake female public prosecutor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.