Join us

SBI बँकेने ६ लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड केले ब्लॉक

By admin | Published: October 19, 2016 8:19 AM

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केल्याचे वृत्त आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केल्याचे वृत्त आहे. एटीएममध्ये व्हायरस घुसल्याच्या भितीने बँकेने तात्काळ हे कार्ड ब्लॉक केल्याची माहिती मिळत आहे तसेच काही कार्डांचे क्लोनिंग करुन गैरव्यवहार सुरु होते. 
 
बँकेला विविध ठिकाणाहून तक्रारी येत होत्या. त्यामुळे बँकेने तडकाफडकी डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. हे सुरक्षेचे उल्लंघन असून अन्य बँकांचे एटीएम वापरल्याने ही समस्या उदभवल्याचे एसबीआयचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी शिव कुमार भासीन यांनी सांगितले. एसबीआय नेटवर्कमधील सर्व एटीएममशीन सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
ग्राहकांचा जो डाटा आहे त्यासंदर्भातील माहितीही चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांचे कार्ड ब्लॉक झाले आहे त्यांनी चिंता करु नये. त्यांनी फोन बँकिग किंवा जवळच्या शाखेत त्वरीत संर्पक साधावा असे एसबीआयकडून सांगण्यात आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहेत.  
 
ग्राहकांना नव्या कार्डासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. डेबिट कार्ड लगेच मिळत नाही त्यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे ग्राहकांना फटका बसला आहे. ज्या बँकांचे एटीएम इन्फेकटेड आहे त्यांनी स्वत:हा पुढे येऊन सांगावे. हे थांबवणे त्यांच्या हातात आहे असे भासीन यांनी सांगितले. आरबीआय संकेतस्थळावरील आकेडवारीनुसार जुलै २०१६ मध्ये एसबीआयची २०.२७ कोटी डेबिट कार्ड वापरात आहेत. त्यातील ०.२५ टक्के कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत.