आदिवासी पाड्यांमध्ये शौचालय बांधण्यासाठी एसबीआय सरसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:37 PM2019-04-15T12:37:02+5:302019-04-15T13:08:27+5:30

आदिवासी पाड्यांमध्ये शौचालयांचा मोठा अभाव असलेला प्रामुख्याने पाहायला मिळतो. मात्र पाड्यांमधील लोकांसाठी शौचालये बांधण्यासाठी एसबीआयने पुढाकार घेतला आहे.

SBI DONATED RS.13.44 LACS FOR CONSTRUCTION OF 75 TOILET BLOCKS IN TRIBAL PADAS | आदिवासी पाड्यांमध्ये शौचालय बांधण्यासाठी एसबीआय सरसावली

आदिवासी पाड्यांमध्ये शौचालय बांधण्यासाठी एसबीआय सरसावली

googlenewsNext
ठळक मुद्देएसबीआयने लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन ट्रस्टला आदिवासी पाड्यांमध्ये 75 शौचालयाच्या बांधकामासाठी 13.44 लाख रूपये देणगी दिली आहे. पालघर तालुक्यातील भरोळ सकवार ग्राम पंचायतीतील सुतार पाडा आणि वीरखंडा पाड्यामध्ये शौचालयाच्या बांधकामासाठी एसबीआय मुंबईने ही देणगी दिलीएसबीआयने सामाजिक भान जपत केलेल्या मदतीमुळे सर्वांनीच एसबीआयचे आभार मानले आहेत. 

मुंबई - आदिवासी पाड्यांमध्ये शौचालयांचा मोठा अभाव असलेला प्रामुख्याने पाहायला मिळतो. मात्र पाड्यांमधील लोकांसाठी शौचालये बांधण्यासाठी एसबीआयने पुढाकार घेतला आहे. स्टेट बँक ऑप इंडियाने लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन ट्रस्टला आदिवासी पाड्यांमध्ये 75 शौचालयाच्या बांधकामासाठी 13.44 लाख रूपये देणगी दिली आहे. 

पालघर तालुक्यातील भरोळ सकवार ग्राम पंचायतीतील सुतार पाडा आणि वीरखंडा पाड्यामध्ये शौचालयाच्या बांधकामासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईने ही देणगी दिली आहे. एसबीआय एलएचओ, मुंबईने लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन ट्रस्टला आदिवासी पाड्यामध्ये 75 शौचालयाच्या बांधकामासाठी 13.44 लाख रूपये देणगी दिली आहे.

75 कुटुंबांना शौचालय बांधून देण्यात आले. यावेळी जी. अप्पा राव यांच्या हस्ते शौचालय उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी महाव्यवस्थापक (बी अ‍ॅन्ड ओ), सामंत, मिश्रा, महेश दाभोकर आणि दीपंकार रॉय, प्रादेशिक व्यवस्थापक, आरबीओ, ठाणे (पश्चिम) यांच्या उपस्थितीत 3 एप्रिल रोजी देण्यात आले. शौचालयामुळे गावातील लोकांना आता उघड्यावर शौचासाठी जावे लागणार नाही. त्यांना या स्वच्छ शौचालयाचा वापर करता येणार आहे. एसबीआयने सामाजिक भान जपत केलेल्या मदतीमुळे सर्वांनीच एसबीआयचे आभार मानले आहेत. 

Pulwama Attack : एसबीआयकडून 23 शहीद सीआरपीएफ जवानांचे कर्ज माफ

देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्यांपैकी 23 जवानांचे कर्ज काही दिवसांपूर्वी माफ केले होते. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.सीआरपीएफच्या शहीद झालेल्या जवानांपैकी 23 जवानांना स्टेट बँकेने कर्ज दिले होते. या जवानांचे कर्ज तात्काळ माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीआरपीएफचे सर्व जवान संरक्षण वेतन पॅकेजद्वारे बँकेचे ग्राहक आहेत. यामुळे प्रत्येक जवानाला बँकेकडून 30 लाखांचा अपघाती विमा दिला जातो असे स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रामध्ये म्हटले होते. बँकेनुसार शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेहमी देशाच्या सुरक्षेसाठी ऊन, वाऱ्याची पर्वा न करता सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांना दहशतवादी हल्ल्यात मरण येणे दु:खदायक आहे. एसबीआयने या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक पाऊल उचललं असल्याचं बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले होते.

 

Web Title: SBI DONATED RS.13.44 LACS FOR CONSTRUCTION OF 75 TOILET BLOCKS IN TRIBAL PADAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय