एक 'पाऊल' कारगिल युद्धातील शहीद जवानांसाठी! सहभागी होण्याचे आवाहन
By ओमकार संकपाळ | Published: May 1, 2024 03:09 PM2024-05-01T15:09:31+5:302024-05-01T15:12:17+5:30
Tiger Hill Kargil Challenge मध्ये सहभागी होणाऱ्यास ८५ दिवस स्पर्धेचा भाग राहावे लागणार आहे.
Kargil Tiger Hill Challenge : २६ जुलै २०२४ रोजी कारगिल विजय दिवसाला २५ वर्षे पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर 'एक फिट भारत' हा उपक्रम राबवला जात आहे. शहीद जवानांच्या कार्याला सलाम म्हणून त्यासाठी फिट भारत या माध्यमातून 'Tiger Hill Kargil Challenge' ही संकल्पना आखण्यात आली आहे. Tiger Hill Kargil Challenge मध्ये सहभागी होणाऱ्यास ८५ दिवस स्पर्धेचा भाग राहावे लागणार आहे.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार चालत किंवा धावून संबंधित अंतर गाठू शकता. ही स्पर्धा ३ मे ते २६ जुलैपर्यंत चालणार आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तुम्हाला ८५ हजार स्टेप्स (पाऊले) पूर्ण करावी लागतील. यात सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसून कोणीही भाग घेऊ शकते. एकूण चार टप्प्यात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. एकूण पाऊले - १५०,००० + २२५,००० + २४०,००० + १५००० = ६३०,०००
पहिला टप्पा - (Preparation For Kargil War)
कालावधी - पहिले ३० दिवस
लक्ष्य - एका दिवसात कमीत कमी ५ हजार पावले चालणे.
एकूण लक्ष्य - १ जूनपर्यंत १ लाख ५० हजार पावले चालणे.
दुसरा टप्पा - (March To Kargil)
कालावधी - पुढचे ३० दिवस
लक्ष्य - एका दिवसात कमीत कमी ७ हजार ५०० पावले चालणे.
एकूण लक्ष्य - १ जुलैपर्यंत २ लाख २५ हजार पावले चालणे.
तिसरा टप्पा (Assault On Tiger Hill)
कालावधी - २ जुलै ते २५ जुलै
लक्ष्य - एका दिवसात कमीत कमी १० हजार पावले चालणे.
एकूण लक्ष्य - २५ जुलैपर्यंत २ लाख ४० हजार पावले चालणे.
चौथा टप्पा (Final Day Of The Challenge)
एकूण लक्ष्य - एकाच दिवशी १५ हजार पावले चालणे.
सहभागी होण्यासाठी काय करावे?
तुम्हाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी App.fitistan.com वर जाऊन संंबंधित ॲप डाउनलोड करावी लागेल. मग तुमचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह सर्व प्राथमिक माहिती भरावी लागेल. यामध्ये तुम्ही वैयक्तिक शिवाय ग्रुप बनवून देखील सहभाग नोंदवू शकता. ६३०,००० पाऊले पूर्ण करणाऱ्यास E-certificate दिले जाईल. स्पर्धा सुरू होण्याच्या तारखेनंतरही तुम्हाला सहभागी होता येणार आहे. यासाठी संबंधित ॲपमध्ये माहिती देण्यात आली असून त्या माध्यमातून तुम्ही स्पर्धेचे भाग बनू शकता.
महत्त्वाची माहिती -
- नोंदणी तारीख - २२ एप्रिल २०२४ पासून सुरू
- नोंदणीसाठी अंतिम तारीख - २५ जून २०२४
- स्पर्धेची सुरुवात - ३ मे २०२४ पासून
- अंतिम दिवस - २६ जुलै २०२४