SBI च्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यनी महिलांना दिला यश मंत्र

By admin | Published: March 8, 2017 07:52 AM2017-03-08T07:52:46+5:302017-03-08T12:09:30+5:30

अरुंधती भट्टाचार्य, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अध्यक्ष हॉँगकॉँगमध्ये नुकत्यात झालेल्या फॉर्च्युन मोस्ट पॉवरफुल विमेन इण्टरनॅशनल समीटमधये त्या सहभागी झाल्या होत्या.

SBI President Arundhati Bhattacharya gave Yash Mantri to the women | SBI च्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यनी महिलांना दिला यश मंत्र

SBI च्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यनी महिलांना दिला यश मंत्र

Next

ऑनलाइन लोकमत 

अरुंधती भट्टाचार्य, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अध्यक्ष हॉँगकॉँगमध्ये नुकत्यात झालेल्या फॉर्च्युन मोस्ट पॉवरफुल विमेन इण्टरनॅशनल समीटमधये त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातील १६४ पॉवरफुल महिलांचा या परिषदेत सहभाग होता. बिझनेस आणि बियॉण्ड अशी थीम असलेल्या या परिषदेत सहभागी यासाऱ्या आपापल्या क्षेत्राचं नेतृत्व करत होत्या. त्या परिषदेत बोलताना अरुंधती भट्टाचार्य यांनी शेअर केलेला हा यशाचा एक खास मंत्र..

धाडस करा. एकदा नाही, नेहमी करा. सवयीचं झालं पाहिजे धाडस करणं आपल्या. मागे मागे राहू नका. महत्वाची गोष्ट काय तर एखादी गोष्ट करणं तुम्हाला मनापासून आवडत असेल, करायचंच असेल ते काम, ती गोष्ट तुम्हाला तर पुढे व्हा, हिंंमत करा आणि ती गोष्ट करा!

पण जमेल का? केलं तर काय होईल? अशी आव्हानांची चिंता करत बसू नका.

आपण नेहमी काय करतो, आपल्या आव्हानांना, समस्यांना इतकं मोठं करतो की त्यांच्यासमोर आपण फारच किरकोळ, आपण कुणीच नाही असं आपल्याला वाटू लागतं.  मी नेहमी सांगते की हे अंधाऱ्या काळ्याकुट्ट रात्री हायवेवरुन आपण गाडी चालवत निघण्यासारखंच आहे हे. आपण गाडी काढतो रस्त्यावर त्या अंधारात काही दिसत नाही. जेमतेम आपल्या हेडलाईटच्या उजेडात दिसतो तेवढाच रस्ता. लांब पाहिलं तर अंधाराचा डोंगर. त्या डोंगरात हरवलेला रस्ता. जाणार कसं?
पण जसंजसं आपण गाडी चालवत पुढे जातो तसतसा रस्ता मोकळा व्हायला लागतो. रस्त्यानं आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या आयुष्यात तरी वेगळं काय होतं?
हेच तर होतं.
अंधाराला घाबरुन मागे हटू नका, वाट सोडू नका. हिंमत केली तर आपला रस्ता आपल्याला दिसतोच..

Web Title: SBI President Arundhati Bhattacharya gave Yash Mantri to the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.