सांडपाण्यावर ‘स्काडा’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:38 AM2018-06-30T02:38:20+5:302018-06-30T02:38:28+5:30

येथून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्याचे व मलजलाचे व्यवस्थापन पालिकेद्वारे केले जाते.

Scada's sight on the sewage | सांडपाण्यावर ‘स्काडा’ची नजर

सांडपाण्यावर ‘स्काडा’ची नजर

googlenewsNext

मुंबई : येथून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्याचे व मलजलाचे व्यवस्थापन पालिकेद्वारे केले जाते. यासाठी महापालिकेची ७ टर्मिनल प्रक्रिया केंद्रे सज्ज असून, याद्वारे सांडपाणी प्रक्रिया करून समुद्रात किंवा खाडीत सोडले जाते. या प्रक्रिया केंद्रांमध्ये आता संगणकीय प्रणाली आधारित ‘स्काडा’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सर्जित होणाºया सांडपाण्याची व संबंधित माहिती तत्काळ स्वरूपात उपलब्ध होत आहे. ही माहिती महापालिकेच्या मलनि:सारण प्रचालन खात्यातील संबंधित अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवर अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅपच्या साहाय्याने उपलब्ध होत आहे. या माहितीमध्ये उत्सर्जित होणाºया सांडपाण्याबाबत दैनंदिन नोंदी तत्काळ स्वरूपात संगणकीय पद्धतीने उपलब्ध होत असल्याने, केंद्रांमधील यंत्रांचे परिरक्षण करण्यासह प्रतिबंधात्मक काळजी घेणे सुलभ होत आहे. परिणामी, सांडपाणी उत्सर्जन व व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासही मदत होत आहे.
मलनि:सारण प्रचालन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी याबाबत सांगितले की, मलनि:सारण प्रचालन खात्यांतर्गत ७ टर्मिनल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही प्रक्रिया केंद्रे कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, घाटकोपर व भांडुप येथे आहेत. या टर्मिनल प्रक्रिया केंद्रांना ४३ सॅटेलाईट उदंचन केंद्रे जोडलेली आहेत. ७ टर्मिनल प्रक्रिया केंद्रांमधून दिवसभरात किती सांडपाणी उत्सर्जित झाले, याची माहिती एकत्रित पद्धतीने एकाच ठिकाणी मिळणे यापूर्वी शक्य नव्हते. तसेच या सांडपाण्याच्या उत्सर्जनासाठी प्रक्रिया केंद्रामध्ये व उदंचन केंद्रामध्ये उदंचन संयंत्रे सुमारे ६ ते ८ फूट उंचीचे व लांबी - रुंदीचे अवाढव्य नॉन रीटर्निंग व्हॉल्व, सुमारे २५ फूट उंचीचे शाफ्ट यांसारखी उपकरणे आहेत. या मोठ्या यंत्रांचे दैनंदिन स्वरूपात परिरक्षण करणे, प्रतिबंधात्मक काळजी घेणे, हे यापूर्वी तुलनेने कठीण होते.

२५ टक्के सांडपाणी सकाळी होते उत्सर्जित
सकाळच्या वेळी पाण्याचा वापर अधिक असल्याने दर २४ तासांत उत्सर्जित होणाºया मलजल व सांडपाण्यापैकी सुमारे २५ टक्के सांडपाणी हे सकाळी ६ ते १० या वेळेत उत्सर्जित होते.
७ प्रक्रिया केंद्रांमधील व १० सॅटेलाईट उदंचन केंद्रांमधील अवाढव्य यंत्रांच्या देखभालीचे वेळापत्रक ठरविणे, हे आता अधिक सोपे होण्यासह दर मिनिटाला किती लीटर सांडपाणी उत्सर्जित झाले, त्यासाठी किती उदंचन संयंत्रे किती वेळ वापरण्यात आली, याबाबतची सांख्यिकीय माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे.
स्काडा प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे प्रक्रिया केंद्रांमधील वेटवेलमधील मलजलाची पातळी, उदंचक संचाची व संबंधित यंत्रांची स्थिती, यंत्रे किती तास चालविण्यात आली याची माहिती, उत्सर्जित केलेला मलप्रवाह, त्यासाठी वापरण्यात आलेली वीज इत्यादी बाबींच्या नोंदी संगणकीय पद्धतीने ठेवणे व संगणकीय पद्धतीनेच या नोंदीचे विश्लेषण करणे शक्य होत आहे.

स्काडा म्हणजे काय? : स्काडामध्ये प्रामुख्याने संगणकीय प्रणाली, अल्ट्रासोनिक सिस्टीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो सेन्सर्स, संगणकीय सर्व्हरचा समावेश आहे. या यंत्रणेतील सर्व संगणक हे सिमकार्डद्वारे मोबाईल नेटवर्कशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नमूद केल्याप्रमाणे १७ ठिकाणी उपलब्ध माहितीचे आदान-प्रदान सहजपणे करता येत असून ही माहिती वांद्रे येथील स्काडा अंतर्गत उभारण्यात आलेल्या मुख्य नियंत्रण कक्षात एकाच ठिकाणी व सहजपणे उपलब्ध होत आहे. ७ प्रक्रिया केंद्रांमधील व १० सॅटेलाईट उदंचन केंद्रांंमधील अवाढव्य यंत्रांच्या देखभालीचे वेळापत्रक ठरविणे, हे आता अधिक सोपे होणार आहे.

आता ७ प्रक्रिया केंद्रे आणि वांद्रे प्रक्रिया केंद्राशी संलग्न असलेली १० सॅटेलाईट उदंचन केंद्रे; याप्रमाणे एकूण १७ ठिकाणे ही अत्याधुनिक स्वरूपाच्या ‘स्काडा’ या संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात आली आहेत.
स्काडामध्ये प्रामुख्याने संगणकीय प्रणाली, अल्ट्रासोनिक सिस्टीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो सेन्सर्स, संगणकीय सर्व्हरचा समावेश आहे. या यंत्रणेतील सर्व संगणक हे सिमकार्डद्वारे मोबाइल नेटवर्कशी जोडण्यात आले आहेत.
त्यामुळे नमूद केल्याप्रमाणे १७ ठिकाणी उपलब्ध माहितीचे आदान-प्रदान सहजपणे करता येत असून, ही माहिती वांद्रे येथील ‘स्काडा’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या मुख्य नियंत्रण कक्षात एकाच ठिकाणी व सहजपणे उपलब्ध होत आहे.

माहिती तत्काळ समजणार
प्रक्रिया केंद्रांमध्ये असणाºया उदंचन संयंत्रांचे व संबंधित यंत्रांचे प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी यापूर्वी लिखित नोंदी नियमितपणे तपासून व त्या नोंदीचे विश्लेषण करून प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्तीचा निर्णय घेतला जात असे.
हे काम मानवीय पद्धतीने होत असल्याने यात निर्णय घेण्यास अधिक वेळ लागत असे. मात्र, आता स्काडा प्रणालीमुळे
सर्व नोंदी संगणकावर स्वयंचलित पद्धतीने घेतल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्ती ही वेळच्या वेळी करणे शक्य होत आहे. तसेच स्काडा प्रणालीमुळे उत्सर्जित सांडपाण्याच्या प्रमाणानुसार उदंचन संयंत्रे स्वयंचलित पद्धतीने किंवा संगणकाच्या साहाय्याने मानवी पद्धतीने बंद करणे वा चालू करणे किंवा एखादे उदंचन संयंत्र बंद पडले असल्यास त्याची तत्काळ माहिती उपलब्ध होणे शक्य होत आहे.
प्रत्येक उदंचन संयंत्राद्वारे किती पाणी उत्सर्जित झाले, याचीही माहिती तत्काळ स्वरूपात
एकाच ठिकाणी उपलब्ध होत
आहे.

२४ ते २८ जून या ५ दिवसांदरम्यान दररोज रात्री १२ ते दुसºया दिवशीच्या रात्री ११.५९ या चोवीस तासांच्या कालावधीदरम्यान महापालिका क्षेत्रातून उत्सर्जित झालेल्या मलजलाची व सांडपाण्याची स्काडा यंत्रणेद्वारे उपलब्ध झालेली माहिती.
२४ जून - सुमारे २५० कोटी लीटर
२५ जून - सुमारे ३११ कोटी लीटर
२६ जून - सुमारे २३२ कोटी लीटर
२७ जून - सुमारे १९६ कोटी लीटर
२८ जून - सुमारे २२६ कोटी लीटर

Web Title: Scada's sight on the sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.