भावनेच्या बाजारात ‘क्राउड फंडिंग’च्या नावाखाली घोटाळा, शस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा मदतीचे कॅम्पेन कितीतरी जास्त

By संतोष आंधळे | Published: August 28, 2022 07:35 AM2022-08-28T07:35:26+5:302022-08-28T07:37:18+5:30

Crowd Funding Scam: वेबसाईट, व्हॉट्सॲपवर आजारी मूल, रडवेले आईबाप आणि उपचारांसाठी येणारा लाखोंचा खर्च भागविण्यासाठीच्या भावनिक आवाहनाचे व्हिडिओ आपण बघतो. मूल वाचावे म्हणून आपण भावनिक होतो.

Scam in the name of 'Crowd Funding' in the market of sentiments, the aid campaign is much more than the cost of the surgery. | भावनेच्या बाजारात ‘क्राउड फंडिंग’च्या नावाखाली घोटाळा, शस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा मदतीचे कॅम्पेन कितीतरी जास्त

भावनेच्या बाजारात ‘क्राउड फंडिंग’च्या नावाखाली घोटाळा, शस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा मदतीचे कॅम्पेन कितीतरी जास्त

Next

- संतोष आंधळे 
मुंबई : वेबसाईट, व्हॉट्सॲपवर आजारी मूल, रडवेले आईबाप आणि उपचारांसाठी येणारा लाखोंचा खर्च भागविण्यासाठीच्या भावनिक आवाहनाचे व्हिडिओ आपण बघतो. मूल वाचावे म्हणून आपण भावनिक होतो. सहानुभूतीपोटी शक्य असेल ती मदत सांगितलेल्या बँक अकाउंटवर जमा करतो. अशा व्यवहाराला क्राऊड फंडिंग म्हणतात. मात्र, अनेकदा रुग्ण उपचार घेऊन गेला तरीही त्याच्या नावावर मदतीचे  कॅम्पेन सुरू असल्याच्या घटना उघडकीस आल्याने या चांगल्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मालाडच्या तुंगा हॉस्पिटल येथील हृदयरोग शल्यचिकित्सक (कार्डियाक सर्जन) डॉ. प्रशांत मिश्रा यांनी या सगळ्या घोटाळ्यावर भाष्य केले 
आहे. लोक त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आपापले अनुभव कथन करीत आहेत.  अन्य डॉक्टरांनीही डॉ. मिश्रा यांचे समर्थन करीत क्राउड फंडिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मिश्रा म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझ्या ट्विटरवर थेट मेसेज पाठवून मला एकाने वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती.  मात्र, मी मिलाप या क्राउड फंडिंग वेबसाईटवर रुग्णाच्या आजाराची पाहणी केली. पायावरील शस्त्रक्रिया होती. त्यांना मी म्हटले, यावरील उपचार आपल्यापेक्षा एक चतुर्थांश खर्चात दहिसर रुग्णालयात होईल. त्यांना रुग्णालयाचा पत्ताही दिला. मला त्यांनी कळवतो, असे सांगून ती  पोस्टच डिलिट केली. त्यानंतर  आणखी माहिती काढली असता त्या रुग्णाला १५ जुलैला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. तरीही ऑगस्टपर्यंत त्याच्यासाठी पैसे मिळविणे सुरूच होते, असे निदर्शनास आले.

लहान मुलाच्या हृदयाला छिद्र होते. त्यासाठी साध्या रुग्णालयात दीड लाखाचा खर्च येतो. कॉर्पोरेट रुग्णालयात तो तीन लाख येऊ शकतो. मात्र, मिलाप वेबसाईटवर या उपचारासाठी एक रुग्णालयाने १२ लाख रुपये बिल दिले होते. जेथे दोन-तीन लाखांची गरज, तेथे सहा लाख रुपयांचे कॅम्पेन चालविले जात आहे. अनेक प्रकरणात मिलाप गरजू रुग्णांसाठी मदत करीत असते. हे मी मान्य करतो, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

किडनी स्टोनच्या उपचारांसाठी १० लाखांचे कॅम्पेन चालविले गेले. मिलापने २२ लाखांचा निधी उभारला. पित्ताशयाच्या उपचारांसाठी २० लाखांचे कॅम्पेन होते, त्यातून ३३ लाख जमा झाल्याची नोंद मिलापच्या वेबसाईटवर आहे. आमच्यावरील सगळे आरोप मी फेटाळतो. रुग्णालय बिलाचे अंदाजपत्रक देते, तेच सोबत जोडले जाते, असे मिलापच्या अनोज विश्वनाथन यांनी सांगितले.  

ज्या रुग्णाचा डिस्चार्ज झाल्यानंतरही कॅम्पेन सुरू असल्याचे डॉ. मिश्रा सांगत आहेत. त्या रुग्णाची आणखी एक शस्त्रक्रिया होणार होती. ते कॅम्पेन अजून आम्ही मान्यही केले नव्हते. कारण त्याच्याकडे रुग्णालयाची आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ते आम्ही पडताळणी करून कॅम्पेन बंद केले. यापुढे आम्ही कोणत्या आजारावर किती खर्च येईल, याची वेबसाईटवर माहिती देऊ. आम्ही रुग्णाच्या नावे कमिशन घेत नाही. दात्यांना स्वखुशीने काही द्यायचे असेल तर देऊ शकतात.      - अनोज विश्वनाथन, सहसंस्थापक, मिलाप

Web Title: Scam in the name of 'Crowd Funding' in the market of sentiments, the aid campaign is much more than the cost of the surgery.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.