Join us

परवाना विभागातही घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:57 AM

रस्ते, नालेसफाई आणि भूखंड घोटाळ्यानंतर आता परवाना विभागातही महापालिकेचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून आपले खिसे भरण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

मुंबई : रस्ते, नालेसफाई आणि भूखंड घोटाळ्यानंतर आता परवाना विभागातही महापालिकेचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून आपले खिसे भरण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. मुंबईत जाहिरात फलक लावण्याची परवानगी देणाऱ्या अनुज्ञापन विभागातील अधिकारी आपल्या मुलाच्या जाहिरात कंपनीला फायदा मिळवून देत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाºयाची सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी दिले.मुंबईतील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा उचलून धरीत विरोधी पक्षनेत्यांनी अनुज्ञापन विभागात घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला. या विभागाचे उपअधीक्षक प्रकाश जाधव यांचा मुलगा प्रतीक जाधव हा एपीटी या जाहिरात कंपनीमध्ये काम करीत आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून आपल्या मुलाला फायदा मिळवून देण्याचे काम ते करीत आहेत. प्रतीक जाधवही वडिलांच्या पदाचा गैरवापर करीत मोठ्या कंपन्यांना धमकावून त्याच्या कंपनीबरोबर करार करण्यास भाग पडत असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. तसेच महिला कर्मचाºयांच्या तक्रारींवरून लैंगिक अत्याचार प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर जाधव यांना समज दिली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.या प्रकरणाची सखोल चौकशी करून याबाबतचा अहवाल स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत आणण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले. मात्र जाणीवपूर्वक बदनाम करून आपली पदोन्नती रोखण्यासाठी हा आरोप होत आहे. माझा मुलगा जाहिरात कंपनीतील मार्केटिंग विभागात आहे. यासंदर्भात वकिलाबरोबर चर्चा करणार असल्याचे उप अनुज्ञापन अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले.

>‘लोकमत’ने वेधले लक्षमुंबईत नाक्यानाक्यावर मोठमोठे होर्डिंग नियमांचे उल्लंघन करीत धोकादायक स्थितीत उभे राहत आहेत. याकडे ‘लोकमत’ने ‘प्रसिद्धीसाठी झळकणाऱ्या होर्डिंगमध्ये हरवला मुंबईचा चेहरा’ या वृत्तातून लक्ष वेधले होते.