मतदारयादीमध्ये घोटाळा; ४ हजार नावे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:02 AM2020-01-08T01:02:58+5:302020-01-08T01:03:04+5:30

मुंबई मनपा वॉर्ड क्र. १४१ मध्ये १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे.

Scandal in electoral rolls; Thousands of names disappear | मतदारयादीमध्ये घोटाळा; ४ हजार नावे गायब

मतदारयादीमध्ये घोटाळा; ४ हजार नावे गायब

Next

मुंबई : मुंबई मनपा वॉर्ड क्र. १४१ मध्ये १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप समाजवादी पार्टीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला.
याबाबत समाजवादी पार्टी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी म्हणाले, २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्र. १४१ मधून काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे विजयी झाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेतून त्यांनी निवडणूक लढविली त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आता वॉर्ड क्र. १४१ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. ते निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीत या वॉर्डमध्ये ३६ हजार मतदार होते. परंतु आता सुधारित यादीमध्ये केवळ ३२ हजार मतदार असून चार हजार नावे गायब आहेत.

Web Title: Scandal in electoral rolls; Thousands of names disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.