Join us

शिष्यवृत्ती, जातपडताळणी प्रमाणपत्र आता २४ तासांत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 5:36 AM

शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी स्वत: महाविद्यालयात जाऊन वैयक्तिक पातळीवर मदत करतात

मुंबई : शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने अवघ्या २४ तासांत दोन्ही प्रमाणपत्र मिळवून देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी स्वत: महाविद्यालयात जाऊन वैयक्तिक पातळीवर मदत करतात मात्र शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधल्यास या विद्यार्थ्यांना अवघ्या २४ तासांत जातपडताळणी आणि शिष्यवृत्ती प्रमाणपत्र मिळवून देण्यात येईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विसावण्यासाठी विरंगुळा केंद्र बांधले,अपंगांनी जिल्हा निहाय नोंद केल्यास त्यांचे हक्क मिळून दिले जातील तसेच उद्योग, व्यवसाय आणि शिक्षणातला वेळ वाचविण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गासाठी स्मार्टकार्ड कार्ड दिले जातील. हे स्मार्ट कार्ड अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय प्रवगार्साठी फायदेशीर ठरतील असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला.सामाजिक न्याय विभाग प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी १०० खाटांचे दोन मुलींचे व मुलांचे वसतिगृह बांधणार असून वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. भाडे तत्त्वावरील वसतिगृह बंद केले जातील. मागासवर्गीय घटकातील नवउद्योजकांना सामाजिक न्याय विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :जात वैधता प्रमाणपत्रशाळाशिष्यवृत्ती