कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती धनादेश

By admin | Published: June 18, 2014 02:51 AM2014-06-18T02:51:29+5:302014-06-18T02:51:29+5:30

कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश कामगार आयुक्त तथा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष एच.के. जावळे यांच्या हस्ते देण्यात आले.

Scholarship checks for workers' children | कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती धनादेश

कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती धनादेश

Next

मुंबई : महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत बांधकाम क्षेत्रातील नोंदीत लाभार्थी कामगारांना गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठीचे अर्थसाहाय्य तसेच त्या कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश कामगार आयुक्त तथा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष एच.के. जावळे यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमास कामगार उपआयुक्त, मुंबई उपनगर (पश्चिम) एस.एस. जाधव, साहाय्यक कामगार आयुक्त सी.जे. किनिंगे, साहाय्यक कामगार आयुक्त बी.बी. वाघमारे यांच्यासह विभागाचे अधिकारी व बांधकाम कामगार वर्ग उपस्थित होता.
जावळे म्हणाले, ‘सर्व बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदीत होऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायला हवा. आपण त्यांना पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत. (प्रतिनिधी)

Web Title: Scholarship checks for workers' children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.