Join us  

मराठी विज्ञान परिषदेतर्फे शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:05 AM

मुंबई : मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहाय्य मिळावे, या उद्देशाने २०१६पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे शिष्यवृत्ती योजना ...

मुंबई : मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहाय्य मिळावे, या उद्देशाने २०१६पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. भौतिक, रसायन, जीवशास्त्र (वनस्पती /प्राणी /सूक्ष्मजीव / जीव-रसायनशास्त्र, लाइफ-सायन्सेस इत्यादी) किंवा एम. ए. (गणित/संख्याशास्त्र) या अभ्यासक्रमाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात एम.एस्सी./ एम. ए.च्या पहिल्यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असून, प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थी निवडण्यात येतील. अर्ज करण्याची वाढीव अंतिम मुदत १५ मार्च असून, अर्जासाठी परिषदेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

----------------

विज्ञानगंगा व्याख्यानमालेचे ऑनलाइन आयाेजन

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा या व्याख्यानमालेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्ती निर्मिती या विषयावर प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. १९ मार्च राेजी सायंकाळी ५ वाजाता ऑनलाइन होणारे हे व्याख्यान विनामूल्य आहे.

--------------

व्यसनमुक्तीच्या निर्धारासह घेतली शपथ

मुंबई : नशाबंदी मंडळाच्या कार्यक्रमात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी नुकताच व्यसनमुक्तीचा निर्धार केला. महिलांमधील व्यसन व व्यसनमुक्तीचे उपाय याविषयांवर चर्चासत्र संपन्न झाले. ज्योती चव्हाण यांनी व्यसनमुक्ती गीते सादर केली. त्याला ढोलकीपटू देवयानी मोरे यांनी साथ दिली. उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी आम्ही व्यसनमुक्तीसाठी आग्रही राहून व्यसनमुक्तीचा संकल्प केला.

..........................................

राममाेहन त्रिपाठी यांना आदरांजली

मुंबई : साहित्यकार डॉ. राममनोहर त्रिपाठी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्ताने कुर्ला पश्चिम न्यू मिलरोड येथील निवासस्थानी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आदरांजली वाहिली. यावेळी अनुराग त्रिपाठी, डॉ. मंजू पांडे, पूनम त्रिपाठी, अंशुल पांडे, सई त्रिपाठी आणि अजीज खान उपस्थित होते.

--------------