रशियातील विद्यापीठांची भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:23 AM2019-07-05T00:23:08+5:302019-07-05T00:23:17+5:30
अनेक रशियन विद्यापीठे ही शंभर वर्षांहूनही जुनी असून, अग्रणी मानली जातात. काही विद्यापीठांनी नोबेल पुरस्कार विजेते घडविले आहेत.
मुंबई : वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांसाठी रशियातील सरकारी विद्यापीठांनी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. ही विद्यापीठे प्रतिष्ठित व जागतिक स्तरावरील पायाभूत, संशोधन सुविधांनी सज्ज आहेत.
अनेक रशियन विद्यापीठे ही शंभर वर्षांहूनही जुनी असून, अग्रणी मानली जातात. काही विद्यापीठांनी नोबेल पुरस्कार विजेते घडविले आहेत. तिथे जाऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाच्या भारतातील वाणिज्यदूतांनी भारतात एड्यूूरशियाला मान्यता दिली आहे. तेथील सरकारी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी हा अधिकृत विभाग आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठीचे कार्यालय आहे. विद्याथ्यांना ६६६.ी४ि१४२२्रं.्रल्ल वर लॉगइन करून अधिक माहिती मिळवता येईल. मनोज पत्की एज्यूरशियाचे भारतातील प्रतिनिधी आहेत. रशियन विद्यापीठांमध्ये पॅकेज पद्धत नसते आणि तेथील विद्यापीठांचे शुल्क भारतात त्रयस्थ पक्षाद्वारे भरण्याची पद्धत नाही.