Join us

मेडिकल, इंजिनीअरिंगसाठी रशियन विद्यापीठांत शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:19 AM

रशियातील सरकारी विद्यापीठांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. मर्यादित जागांमुळे गुणवत्ता असूनही कित्येक विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही.

मुंबई : रशियातील सरकारी विद्यापीठांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. मर्यादित जागांमुळे गुणवत्ता असूनही कित्येक विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठांचे अभ्यासक्रम व शिष्यवृत्ती उपयोग होऊ शकेल.आय एम सेचेनोव्ह मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटी, टेमबॉव्ह स्टेट युनिव्हर्सिटी, पायटीगोर्स्क वोल्गोग्रड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, अस्त्राखान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, साराटोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी व रशियातील युरोपचा भाग असलेल्या क्षेत्रांतील विद्यापीठांचा यात समावेश आहे. कित्येक रशियन विद्यापीठे ही शंभरहूनही अधिक वर्षे जुनी आहेत. वैद्यकीय, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांमधील संशोधनात रशियातील कित्येक विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. तिथे शिकलेले अनेक डॉक्टर्स व इंजिनीअर्स सध्या भारतात तसेच अन्य देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत. अभ्यासक्रम व प्रवेशांबाबत सुरक्षा व पारदर्शकता राखण्यासाठी रशियाच्या भारतातील वाणिज्य दुतावासाने ‘एज्युरशिया’ची नेमणूक केली. ही संस्था रशियन विद्यापीठांमधील प्रवेशासाठीचा भारतातील अधिकृत प्रवेश विभाग आहे. अधिक माहितीसाठी ६६६.ी४ि१४२२्रं.्रल्ल या वेबसाइटवर संपर्क साधता येईल.

टॅग्स :शैक्षणिक