"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:54 AM2023-03-19T11:54:36+5:302023-03-19T11:57:52+5:30

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्तानं सचिन उपस्थित होता.

School begins with Chhatrapati Shivaji Maharaj s lesson and cricket begins at Chhatrapati Shivaji Maharaj ground sachin tendulkar mumbai janata raja play | "शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली

"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्यानं आणि क्रिकेटची सुरुवातही..."; सचिनने मनं जिंकली

googlenewsNext

"शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली," अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर याने भावना व्यक्त केल्या. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी 'जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून त्यानिमित्तानं सचिन तेंडुलकर उपस्थित होता.

रोज या प्रयोगाची सुरुवात तुळजाभवानीच्या आरतीने होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करुन प्रयोगांच्या मालिकेला सुरुवात झाली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर आदींनी हजेरी लावली.

तर शनिवारी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आरती करुन प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजंन करणाऱ्या आमदार अँड आशिष शेलार यांनी सचिन तेंडुलकर यांचे स्वागत केले. याच मैदानावरुन सुरुवात करुन आपण क्रिकेटचे मैदान गाजवलेत आज पुन्हा एकदा भाषणाने मैदान गाजवा, असे आवाहन करीत सचिन तेंडुलकर यांंचे आभार मानले.

Web Title: School begins with Chhatrapati Shivaji Maharaj s lesson and cricket begins at Chhatrapati Shivaji Maharaj ground sachin tendulkar mumbai janata raja play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.