Join us

रुग्णालयात भरते मुलांची शाळा

By admin | Published: December 09, 2015 1:08 AM

कर्करोगाने ग्रस्त शालेय मुलांना उपचारामुळे अभ्यास, छंद, गाणी, चित्रकला अशा आवडीनिवडी जोपासणे अवघड जाते. त्यांचा सगळ््यापासूनच या मुलांचा संपर्क तुटतो

मुंबई: कर्करोगाने ग्रस्त शालेय मुलांना उपचारामुळे अभ्यास, छंद, गाणी, चित्रकला अशा आवडीनिवडी जोपासणे अवघड जाते. त्यांचा सगळ््यापासूनच या मुलांचा संपर्क तुटतो, पण टाटा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त मुलांची रुग्णालयातच शाळा सुरू करण्याचा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णालयात शाळा भरवणारे टाटा हे पहिले रुग्णालय ठरले आहे.देशभरातून कॅन्सरवरील उपचारासाठी लोक टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी येतात. आपले मूल ठणठणीत बरे व्हावे, म्हणून दुरवरून पालक मुलाला टाटा रुग्णालयात घेऊन येतात. येथून उपचार घेऊन मुले घरी परतात. उपचारादरम्यान अभ्यास न झाल्याने मुले पुन्हा शाळेत जायला तयार होत नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारमान्य कॅन्शाला, तसेच टाटा रुग्णालय आणि ‘आयएमपीएसीसीटी’ संस्थेने सुरू केली आहे. लहान कर्करोग रुग्णांसाठी रुग्णालयात ‘कॅन्शाला’, ‘शनिवार-रविवार वर्ग’ आणि ‘माइंडस्प्रिंग इनरिचमेंट सेंटर’ असे तीन उपक्रम रुग्णालयातच राबविले जातात. दिवसातील तीन ते चार तास या शाळेत मुलांना अभ्यास शिकवला जातो. ५ ते १५ वयोगटातील मुलांना या शाळेत शिक्षण दिले जाते. त्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या शाळेत शिकलेल्या मुलांना प्रशस्तिपत्र देण्यात येते. हे प्रशस्तिपत्र शाळेत दाखवल्यावर या मुलांना पुढच्या इयत्तेत प्रवेश दिला जातो. काही मुलांना शनिवार-रविवार प्रशिक्षण दिले जाते.