Join us

२ नोव्हेंबरला शाळा बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 5:42 AM

शासनाच्या सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खासगी शिक्षण संस्था व त्यावर कार्यरत शिक्षक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

मुंबई : शासनाच्या सततच्या अशैक्षणिक धोरणामुळे खासगी शिक्षण संस्था व त्यावर कार्यरत शिक्षक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. संस्थाचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत लक्ष वेधण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळा बंदचा इशारा दिला आहे. राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक-मुख्याध्यापक संघटना यात सहभागी होणार आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे एकदिवसीय आंदोलन केले जाणार असून त्याची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन केले जाईल, असे महामंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष डॉ. विनय प. राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :शाळा